आ. नमिता मुंदडा यांनी अधिवेशन काळात आणला ७१ कोटींचा निधी


आ. नमिता मुंदडा : कार्यतत्पर आमदार, कामगिरी दमदार!
केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील दळणवळण वाढविण्याच्या दृष्टीने रस्तेविकासावर भर दिला आहे. मागील वर्षभरात विधानसभेच्या दोन अधिवेशनात आ. मुंदडा यांच्या माध्यमातून केज मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी ७१.१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आ. मुंदडा यांनी मतदर संघातील चार प्रमुख रस्त्यांसाठी १८ कोटी आणि अंबाजोगाई शहरातील रस्त्यांसाठी १०५ कोटी रुपये यापूर्वीच प्रयत्नपूर्वक मंजूर करून आणले आहेत. आ. मुंदडा यांच्या कार्यतत्परतेची चुणूक पाहून राज्य सरकारनेही केज मतदार संघावर अक्षरशः निधीचा वर्षाव सुरु ठेवला आहे.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून नमिता मुंदडा या प्रथमच आमदार झाल्या. मुंबईसारख्या महानगराची पार्श्वभूमी तसेच परदेशातील उच्चशिक्षण असतानाही त्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी समरस झाल्या. शेतकरी, कामगारांचे प्रश्न, खेड्यापाड्यातील ग्रामस्थ ते शहरातील नागरिक यांच्या सर्व अडीअडचणींचा अभ्यास करत त्यांनी ते सोडविण्याच्या दृष्टीकोनातून शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. कल्याणकारी विविध मागण्यांची हजारो पत्रे त्यांनी शासनदरबारी पाठवून आणि त्या पूर्ण करून घेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी भर दिला. राज्यातील सर्वाधिक कर्तव्यदक्ष महिला आमदारांमध्ये नमिता मुंदडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विधानसभेत आ. मुंदडा यांनी मांडलेले प्रश्न आणि मागण्या चांगल्याच गाजल्या. सुरुवातीच्या पावणेतीन वर्षाच्या कालावधीत स्वपक्षाचे सरकार नसतानाही त्यांनी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. अशी किमया करणाऱ्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. सत्ताबदल होताच मुंदडा यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षाने शेकडो कोटींचा निधी त्यांच्या मतदार संघात दिला आहे.


वाहतुकीसाठी रस्ते चांगले असतील तर ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क सुलभ होईल आणि छोट्या गावांच्या विकासावर त्याचा सकारत्मक परिणाम होईल हे जाणून आ. मुंदडा यांनी पहिल्या टर्ममध्ये ग्रामीण भागातील रस्ते विकासावर भर दिला आहे. मागील वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात झालेला विधानसभेच्या दोन अधिवेशनात आग्रही मागण्या मार्गी लावून त्यांनी मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तब्बल ७१.१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश मिळविले. यातून अनेक गावांना जोडणाऱ्या रस्ते आणि पुलांची कामे होणार असून ग्रामस्थ शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण यांचा प्रवास सुखकारक होणार आहे. मतदार संघातून आ. मुंदडा यांच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान असून त्यांच्या कार्याचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, केज मतदार संघातील विविध ग्रामीण रस्त्यांची मागणी प्राधान्याने मान्य करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
जून – २०२२ च्या अधिवेनात मंजूर रस्ते
हिवरा पहाडी, कोरडेवाडी, विडा, मस्साजोग, बोरगाव भोपला (३१ ते ३१.८ किमी) – ६ कोटी
खडी, चौसाळा, साळेगाव, माळेगाव (५८ ते ७१ किमी) – ९ कोटी
उंदरी, जानेगाव, कुंबेफळ, येडेश्वरी साखर कारखाना ते राज्य महामार्ग क्र. ६४ – ६ कोटी
उंदरी, जानेगाव, कुंबेफळ, येडेश्वरी साखर कारखाना ते राज्य महामार्ग क्र. ६४ (९ ते १६.२ किमी सिमेंट कॉंक्रीट) – १० कोटी
दिंद्रुड, आडस, होळ, बोरी सावरगाव, बनसारोळा प्र.जि.मा. ५९ (७० ते ७५.८ किमी) – ४.५ कोटी
दिंद्रुड, आडस, होळ, बोरी सावरगाव, बनसारोळा ते इस्थळपर्यंत (४९ ते ५० किमी, ५५ ते ६० किमी) – ४.५ कोटी
अण्णाभाऊ साठे चौक ते मांडवा रोड (० ते ६ किमी) – १० कोटी
डिसेंबर – २०२२ च्या अधिवेनात मंजूर रस्ते
खर्डा, चौसाळा, साळेगाव, माळेगाव (७६ ते ८९ किमी, ९१ ते ९८ किमी) – ५ कोटी
येळंब, माउली चौक, चाकरवाडी फाटा (२ किमी) – ५ कोटी
खर्डा, चौसाळा, साळेगाव, माळेगाव (९२.६ ते ९४.५ किमी) – ४ कोटी
दिंद्रुड, आडस रोड, इस्थळ (६७.५ ते ७० किमी) – ४ कोटी
नाबार्ड पूल
चनई, आडस रोडवरील पूल – १.८० कोटी
येल्डा, ममदापूर, राक्षसवाडी पूल – १.३० कोटी