ना तमा ऊन वारा पावसाची आ. मुंदडा यांना ध्यास विकासाची
केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी गेली पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये विकासाच्या ध्येयाने झपाटून काम केले असून त्यांच्या या कामाची मतदार संघातील प्रत्येक सामान्य माणसाने दखल घेतली असून या निवडणुकीत त्यांचाच विजय निश्चित असल्याचे चर्चा मतदारांत ऐकावयास मिळत आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा या अलिकडेच त्या रबरी स्टॅम्प असल्याची टिका विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र त्या रबरी स्टॅम्प नसून मतदार संघाच्या विकासासाठी आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेत असल्याचे दिसून येते.
आ. नमिता मुंदडा या स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे मतदार संघाच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर असून मतदार संघात विकसीत शहरांमध्ये मध्ये असलेल्या सर्व स्तरातील पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदार संघातील महिलां व मुलींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी स्वतंत्र मॉर्निंग ट्रॅक व सुक्ष्म व्यायाम करण्यासाठी हवे असलेले मॉर्निंग ट्रॅक, मुलींचे व महिलांचे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी व इतर सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र अद्दायावत स्त्री रुग्णालय, स्वतंत्र अभ्यासिका व इतर उपक्रम त्या पुढील राबवण्याचा त्यांचा माणसं आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी त्या केवळ मंत्रालयातुन निधीच उपलब्ध करून देत नाही तर उपलब्ध निधीचा योग्य विनियोग केला जातो की नाही हे पहाण्यासाठी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता त्या स्वत: संबंधित साईड ला भेटी देऊन संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना संबंधित कामाच्या त्रुटी दूर करून काम व्यवस्थित करण्याच्या सुचना ही देत असतात.
याशिवाय आ. नमिता मुंदडा यांचा विधानसभा अधिवेशन काळातील मतदार संघाच्या प्रलंबित कामाच्या सोडवणुकीसाठी प्रश्नांच्या माध्यमातून आपला आवाज उठवताना सातत्याने दिसतात. आपल्या दोन्ही प्रसुती पुर्वी ही त्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या कालावधीत सहभागी झाल्याचेही संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्या केवळ रबरी स्टॅम्प नसून ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता केवळ मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या एक दमदार आमदार असल्यामुळे या निवडणुकीत त्या निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.
