महाराष्ट्र
NAAC न झालेल्या मराठवाड्यातील २३३ महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केली स्थगीत

बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयाचा समावेश
NAAC न झालेल्या मराठवाडा विभागातील २३३ महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रियेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एका परीपत्रकान्वये स्थगित केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयांचा समावेश आहे.

विद्यापीठाने परीपत्रकाव्दारे दिली माहिती
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दि. १७ मे २०२५ एक परीपत्रक प्रसिद्ध केले असून या परीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त विषय व संदर्भानुषंगाने मा. कुलगुरू महोदयांनी दिलेल्या आदेशान्वये विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, मा. व्यवस्थापन परिषदेच्या २२-११-२०२४ रोजीच्या बैठकीतील मुद्दा क्रमांक ४ नुसार नॅक मूल्यांकनासाठी पात्र असलेल्या ज्या महाविद्यालयांनी अद्यापही नॅक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता स्थगित (शुन्य) करणेबाबत कार्यवाही करणे बाबत ठराव घेण्यात आला असून त्यानुसार या कार्यालयाचे परिपत्रक क्र. शैक्ष/संलग्न/पीबीजी/२०२४-२५/१०५०७-१६ दि.०६-१२-२०२४ नुसार सर्व महाविद्यालयांना गुगल फार्ममध्ये माहिती सादर करण्याचे कळविले होते.
