महाराष्ट्र

सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी; लातुरात सर्वाधिक भाव!

राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढलेले सोयाबीन दर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत खाली आले होते, गेल्या आठवडा भरापासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना, आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील लातूर बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक दर मिळाला आहे.
सोयाबीनच्या भावाचा आलेख यावेळी वर-खाली होत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात सोयाबीनच्या दराने विक्रम मोडले होते, तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता, तर तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या भावात अचानक घसरण होऊन कमाल भाव पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मर्यादित राहिले. सलग ५ दिवस सोयाबीनच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोयाबीनमध्ये वाढ झाली आहे, लातूर बाजार समिती मध्ये आज सर्व बाजार समित्यांमधील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.
सोयाबीनचा बाजार झपाट्याने वाढत आहेत, लातूर मार्केटमध्ये ६२७१ वर पोहोचला, आज लातूर कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीनला ६२७१ रुपये दर मिळाला तर किमान भाव ५२०० रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव ५८०० रुपये प्रति क्विंटल होता. दर्जासह सोयाबीनची किंमत पाहिली तर फुले संगम व इतर काही दर्जाच्या सोयाबीनची किमान किंमत ५२०० रुपये आणि कमाल भाव ५८५१ रुपये प्रति क्विंटल आहे, तर इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किंमत ४,४००-६,००० रुपये प्रति क्विंटल आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button