बीड

दिव्य ज्योति जाग्रति संस्थानची गुरूपोर्णिमा परळीत उत्साहात साजरी

गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-सुश्री दीपिका भारती

परळी वैजनाथ / प्रतिनिधी
गुरूच शिष्यांना कल्याणाचा महामंत्र देतो-सुश्री लक्ष्मी भारतीजी

भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री दीपिका भारती यांनी व्यक्त केले. सद्गुरुच शिष्यांना कल्याणाचा योग्य मार्ग दाखवतो असे प्रतिपादन सुश्री सुश्री  लक्ष्मी भारतीजी यांनी व्यक्त केले.

परळी येथील हालगे गार्डन येथे आज रविवार दि.17 जुलै 2022 रोजी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने आयोजित गुरू पोर्णिमा उत्सव 2022 प्रसंगी प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री दीपिका भारती बोलत होत्या.कार्यक्रमस्थळ भक्तांनी आकर्षकरित्या सजविल्याने आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरात रांगोळी काढून आणि सुशोभिकरण केल्याने वातावरण प्रसन्न दिसत होते. प्रवेशद्वारालाच प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे आकर्षक स्वरूप एका सुंदर मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या मंदिरापुढेही आकर्षकरित्या काढलेली रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. सत्संग परिसरात विविध साहित्याचे स्टॉल लावले होते.

आपल्या सत्संग कार्यक्रमातून सुश्री दीपिका भारतीजी यांनी  गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केले. ते म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा श्री हनुमंतासारखी पारदर्शक असावी. श्रीराम व हनुमान यांचे संदर्भ उदाहरण देवून  सुश्री दीपिका भारतीजी  पुढे म्हणाल्या की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे सुश्री दीपिका भारती म्हणाल्या.

या कार्यक्रमात बोलतांना सुश्री सुश्री लक्ष्मी भारतीजी यांनी सांगितले की, सध्याचे जीवन अत्यंत खडतर असून स्पर्धेच्या युगात मानव नाहकपणे भरकटत आहे. अशावेळी गुरू त्यांना योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो असे ते म्हणाले. दरम्यान सर्वश्री आशुतोषजी महाराज हे आम्हा सर्वांचे गुरू असून त्यांनी दिलेली शिकवण आमच्या जीवनाचे सार्थक करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास सुश्री सुश्री  लक्ष्मी भारतीजी यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरूचरणी विविध भजने सादर करण्यात आली. टाळ तसेच संगीताच्या स्वरध्वनीवर गुरू पोर्णिमा उत्सव व सभागृह अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. व्यासपीठावर प.पू. सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य  स्वामी निरूपानंदजी  सुश्री सुश्री  लक्ष्मी भारतीजी, सुश्री सुषमा भारतीजी, सुश्री निमलता भारतीजी आदी उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित साधक व भक्त टाळ्यांच्या गजरामध्ये भजनात सहभागी झाले होते. परळीसह अंबाजोगाई, सोनपेठ,डाबी, नागापुर, कौठळी, संगम, सिरसाळा, गंगाखेड, नांदेड, सिरसाळा,माजलगाव, कळंब, केज, लातूर आदी ठिकाणाहून भाविकांची अलोट गर्दी या सत्संग सोहळयास लाभली होती. गुरूपोर्णिमेच्या या कार्यक्रमामुळे परळी शहरात धार्मिकतेचे भरगच्च वातावरण दिसून येत होते.

 

 

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker