पायी ज्योत घेवून जाणाऱ्या भाविकांना ट्रॅव्हल्सने उडविले; १ भाविकाचा मृत्यु तर ९ जखमी

बीड / अरण ते गायकवाडजळगाव अशी पायी ज्योत घेवून जाणाऱ्या भाविकांना ट्रव्हल्सने उडविल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यु तर अन्य नऊ जण जखमी झाल्याची घटना हिरापुर ते ईटकुर रस्त्या दरम्यान घडली असून जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अरण येथुन ज्योत घेवून पायी निघालेले भाविक गायकवाड जळगाव कडे जात असताना बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर हिरापुरते ईटकुर दरम्यान एमएच 20 ईजी 0055 या ट्रॅव्हल्सने भाविकांना धडक दिली. या अपघातामध्ये हनुमंत अण्णासाहेब आगरकर (वय 42) या भाविकाचा जागीच मृत्यु झाला तर विश्वंभर देविदास अंतकर, शैलेश जानकीराम कातखडे, ऋषीकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडू वाघमारे, नंदु भाऊसाहेब आगरकर, बाळू आगरकर हे जखमी झाले असून जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (1 dead and 9 injured in an accident involving devotees carrying Jyot for God)




