

मंदिराचे गाव
Author: Sudarshan Rapatwar Category: Publisher: Madhyam Publication Published: August 15, 2024 ISBN: 9788190278775 Tags: Ambajogai | Ambajogai Book | Book By Sudarshan Rapatwar | Mandirache Goan | Mandirache Goan Book By Sudarshan Rapatwar |आरंभीच्या काळापासून अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे; याची कारणे अनेक आहेत. मराठी काव्यातील पहिली ओळ विवेकसिंधूच्या माध्यमातून मुकुंदराजाने लिहिली ती याच भूमीत. ही भूमी केवळ मराठीच्या कवितेची जन्मभूमी नाही; तर आद्यकवि मुकुंदराजांची कर्मभूमीही आहे. या गावात सुरुवातीपासूनच अनेक मंदिरे आहेत. गावात आणि परिसरात असलेली संकलेश्वर, अमलेश्वर, केदारेश्वर, मानकेश्वर, काशीविश्वनाथ, खोलेश्वर, बुट्टेनाथ, नागनाथ, रेणुकाई मंदिरांसह कोकणवासी यांची कुलस्वामिनी आणि अंबानगरी परिसराची ग्रामदेवता म्हणून प्रख्यात असलेल्या श्री योगेश्वरी मातेच्या मंदिरासह अनेक मंदिरे या गावात आणि परिसरात दिमाखाने आपले सौदर्य खुलवित उभी आहेत. या मंदिरात असणाऱ्या मंदिरांची संख्या आणि सौदर्य लक्षात घेतले; तर या गावाला मंदिराचे गाव म्हणणे अधिक उचित आणि संयुक्तीक ठरेल असे वाटते. – पुस्तकासाठी संपर्क सुदर्शन रापतवार 9422240017
Back