विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात पोहोचत असतांनाच या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी दिव्यांग युवा मतदार पुढे सरसावला आहे. समर्थ अनंत म्हणे हे या दिव्यांग मतदारांचे नांव असून या निवडणुकीत तो पहिल्यांदाच मतदान करणार आहे. केज विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षाच्या काळात आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या कामाने प्रभावित होवून त्याने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात समर्थ अनंत मसणे याने समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली असून या पोस्ट मध्ये तो पुढे असे म्हणतो की, “राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक ही शासन व्यवस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. निवडणुकीद्वारे पक्ष, बहुमताच्या आधारे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे हस्तांतरीत केली जाते. मतदानाने लोकप्रतिनिधी निवडले जातात, जसं कलावंतासाठी रसिक आवश्यक असतात. त्याचप्रमाणे मतदारसंघाच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. लोकप्रतिनिधी मतदारसंघाचा आत्मा असतो.
एक आदर्श लोकप्रतिनिधी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण नमिताताईंच्या ठायी आहेत. त्या उच्चविद्या विभूषित आहेत, त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. नमिताताई यांनी केज मतदार संघाचा कायापालट केला आहे. त्यांच्या नेतृत्वात केज मतदार संघाने विकासाचे सर्व शिखर सर केले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, बहुधार्मिक, आरोग्य, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये मतदारसंघात त्यांनी आपला नावलौकिक कमवला आहे.
विमलताईंनी सुरू केलेला विकास कामांचा वारसा त्या सक्षमपणे पुढे चालवत आहेत. करोना काळातलं त्यांचं काम उल्लेखनीय होतं. निवडणूक जवळ आली की उमेदवार प्रचार करतात. प्रचार करणं ही निवडणूकीचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु नमिताताईंना प्रचार करण्याची गरज नाही, त्यांनी केलेले विकासकाम हाच त्यांचा प्रचार आहे.
प्रत्येक नागरिकाची महत्त्वाकांक्षा असते की, आपला मतदारसंघ विकसीत असावा. आपल्या मतदारसंघात सुख-सुविधांची भरभराट असावी, या सर्व महत्त्वाकांक्षा वास्तवात आणण्याची क्षमता फक्त नमिताताई यांच्यामध्ये आहे.
येणाऱ्या विधानसभेला नमिताताईंना मत म्हणजे… केज मतदार संघाच्या उज्वल भविष्याला मत. चला तर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत नमिताताईंना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि केज मतदार संघाच्या विकासामध्ये हातभार लावूया !
माझ्या आयुष्यातील पहिले योग्य मतदान… विकासाभिमूक उमेदवाराला… म्हणजेच सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांना
▪️ समर्थ अनंत मसने (दिव्यांग) स्वाराती महाविद्यालय, अंबाजोगाई,
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.