भारत -पाक सीमेवर अलिकडील काळात उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी या दोन दिवसांत घेतलेल्या अतिशय संवेदनशील भुमिकेचे राज्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करुन माजी सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते तर आज त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणारा खर्च देशसेवेसाठी बलिदान केलेल्या, देशसेवेसाठी कर्तव्यावर असलेल्या सैनिक कुटुंबियांच्या कल्याणासाठी पंतप्रधान कल्याण निधीस भरीव मदत पाठवण्याचे भावनिक आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.
चला हवा येवू द्या व मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे होते नियोजन
अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, प्रशांत आदनाक, अमोल पवार, अनंत अरसुडे व मित्र परिवाराच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अग्रगण्य ठरत असलेल्या “चला हवा येवू द्या” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत असे कार्यक्रम घेणे योग्य नाही म्हणून हे वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात येणार इतर सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अक्षय मुंदडा यांनी केली भावनिक पोस्ट
१३ मे रोजी माझा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आशिर्वाद द्यायला. तर कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्र हे शुभेच्छा देण्यासाठी व भेटायला येतात. वाढदिवस हे निमित्त असले तरी यानिमित्ताने आपली सर्वांची भेट होणे हे महत्त्वाचे असते.
अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटणारे नाही
मात्र सध्या हिंदुस्थान व पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या बहाद्दूर सैनिकांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतावून लावला आहे. आणि नतदृष्ट पाकिस्तानला पुन्हा एकदा कायमची अद्दल घडवून व धडा शिकवला आहे. या युध्दात शुर भारतीय जवान, अधिकारी व नागरिक देशासाठी शहीद झाले आहेत. अशा परिस्थितीत मी माझा वाढदिवस हारतुरे, पुष्पगुच्छ, भेटवस्तू घेवून उत्साही वातावरणात साजरा करणे हे माझ्या मनाला पटणारे नाही.
आपल्या अंतःकरणातील शुभेच्छा माझ्यासाठी महत्वाच्या!
आपल्या सर्वांच्या अंतःकरणातील सदिच्छाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा आहेत. आपले सर्वांचे प्रेम आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. करीता शुभेच्छुकांनी मला भेटायला येताना पुष्पगुच्छ किंवा हारतुरे आणू नये.
पीएमओ केअर रिलीफ फंडाला मदत सढळ हाताने पाठवा!
वर्षानुवर्षे ऊन-थंडी-वाऱ्याचा सामना करीत, अहोरात्र भारताच्या सिमेचे रक्षण करणाऱ्या शहीद व जखमी सैनिकांच्या, अधिकारी व नागरिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना व देशाला मदतीचा हात देण्यासाठी आपण सर्वांनी पीएम केअर रिलीफ फंडाला सढळ हस्ते मदत करावी.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.