महाराष्ट्र

९५ वर्षीय आजोबांवर डॉ. दिपक कटारे यांनी केली यशस्वी ऍंजिओप्लास्टी


-हदय विकाराचा तीव्र झटका आलेल्या एका ९५ वर्षीय आजोबांवर यशस्वी रित्या ऍंजिओप्लास्टी करण्यात प्रख्यात -हदयरोगतज्ञ डॉ. दिपक कटारे यांना यश आले आहे. ९५ वर्षीय वृध्द आजोबांवर अतिशय जोखमीची असलेली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल डॉ. दिपक कटारे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, केज येथील रहिवासी असलेले ९५ वर्षीय आजोबा मालू गओचडए यांना -हदयविकाराचा तीव्र तास होत असल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना घेवून डॉ. दिपक कटारे यांच्या ग्लोबल हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. डॉ. दिपक कटारे यांनी सदरील आजोबांची अत्यंत बारकाईने तपासणी केली असता त्यांना -हदयविकाराचा तीव्र झटका येवून गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. या नंतर डॉ. दिपक कटारे यांनी सदरील आजोबांना तातडीने रक्त पातळ करण्याची औषधे सुरु करुन -हदयविकाराची संपुर्ण उपचार त्यांचेवर सुरु केले.
याच प्रक्रिये दरम्यान डॉ. दिपक कटारे यांनी सदरील मालू गोचडे आजोबांची ऍंजिओग्राफी केली तेव्हा त्यांच्या -हदयाच्या उजव्या नाडी मध्ये ९० टक्के ब्लॉकेज आणि रक्ताच्या गुठळ्या असल्याचे निदर्शनास आले.


अशा प्रकारचे ब्लॉकेज असलेल्या रुग्णांना ऍंजिओप्लास्टी अथवा बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला -हदयरोग तज्ञ डॉक्टर देतात. मात्र सदरील रुग्णांचे वय लक्षात घेता ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास करणे या दोन्ही गोष्टी अत्यंत जोखमीच्या होत्या. म्हणून सदरील रुग्णांस प्रथम दोन दिवस प्रकृती स्थिर होण्यासाठी योग्य ते औषधोपचार करुन ऍंजिओप्लास्टी अथवा बायपास शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय डॉ. दिपक कटारे यांनी घेतला.
दोन दिवसानंतर या ९५ वर्षीय मालू गोचडे आजोबांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर नातेवाईकांना विश्वासात घेवून सर्व परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगितली. अशा वयोवृद्ध रुग्णांवर बायपास शस्त्रक्रियेची अधिक रिस्क अधिक असते, हे सांगितल्यानंतर ही रुग्णांचे नातेवाईक ही मेडिकल बॅकग्राऊंड चे असल्याने त्यांचे सहमतीने सदरील ९५ वर्षीय आजोबांवर ऍंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी डॉ. दिपक कटारे यांनी अशा वयोवृद्ध रुग्णांवर ऍंजिओप्लास्टी केल्यानंतर अतिरक्तस्राव होणे आणि पुन्हा रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका अधिक असतो हे सांगितल्यानंतर ही रुग्ण आणि नातेवाईकांच्या सहमतीनंतर डॉ. दिपक कटारे यांनी सदरील ९५ वर्षीय मालू बोचले आजोबांवर यशस्वी ऍंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.


वैद्यकीय क्षेत्रात अलिकडील काळात ९५ वर्षीय आजोबांवर अशा प्रकारची जोखमीची शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक काम होते. मात्र रुग्ण आणि नातेवाईक यांच्या सहमतीने डॉ. दिपक कटारे यांनी ही अतिशय जोखमीची ऍंजिओप्लास्टी अत्यंत यशस्वीरित्या पुर्ण केली.
डॉ. दिपक कटारे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील -हदय विकारांवर महत्वाचा उपचार करणारे कॉर्डियोलॉजी मधील उच्च शिक्षण नवीदिल्ली येथे जागतिक कीर्तीच्या -हदयरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केल्यानंतर आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवा कालावधीत ९५ वर्षीय आजोबांवर ही अत्यंत जोखमीची असणारी ऍंजिओप्लास्टी पुर्ण करुन आजोबांची प्रकृती परत ठणठणीत केल्याबद्दल डॉ. दिपक कटारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker