महाराष्ट्र
कार्यकर्त्यांच्या गर्दीने आई निवास फुलला; मुंदडा परिवाराचे अभिनंदन करण्यास लोटली गर्दी!

केज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांचे अभिनंदन करण्यासाठी आज आई निवासस्थानी केज विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी मोठी गर्दी केली.
विजयी मिरवणूकीतही होती मोठी गर्दी!
आ. नमिता मुंदडा यांच्या विजयानंतर काल रात्री अंबाजोगाई शहरातील प्रमुख मार्गावरून मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मतदार संघातील हजारो तरुणांनी आपला आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ पासूनच होती गर्दी!
आज सकाळपासून आ. नमिता मुंदडा यांच्या आई निवासस्थानी मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आ. नमिता मुंदडा यांच्या सोबतच अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या वैयक्तिक भेटी घेत या सर्वांनी आपला आनंद साजरा केला. यावेळी आपल्या भेटीसाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आतिथ्य मुंदडा परिवाराच्या वतीने करण्यात आले.

१ लाख ५५ हजार ६८९ मते घेऊन विजय
केज विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते घेऊन विजयी ठरल्या आहेत . आ.नमिता मुंदडा यांनी मागील ५ वर्षांत मतदारसंघात जवळपास २ हजार कोटींची विकासकामे केली. या कामांमुळे सामान्य मतदार या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असल्यामुळे या निवडणुकीत जवळपास ३ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन नमिता मुंदडा या विजयी झाल्या.
