महाराष्ट्र

रहीमभाई यांचा रोजा इफ्तार कार्यक्रम; समाज बांधवांची मोठी उपस्थिती !

अनेक वर्षांपासून सुरू आहे उपक्रम

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंबाजोगाई नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम यांनी आयोजित केलेल्या इफ्तहार कार्यक्रमास शहर व परिसरातील मुस्लिम आणि हिंदू समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत शेख रहीम भाई, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा आणि यांनी प्रत्येकाची वैयक्तिक भेट देवून केले.

जातीय सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न

अंबाजोगाई शहर व परिसरातील हिंदु आणि मुस्लिम बांधवांमध्ये गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला जातीय सलोखा कायम रहावा व येणा-या नव्या पिढीमध्ये ही या जातीय सलोख्याची बीजे पेरली जावीत यासाठी गेले अनेकवर्षापासुन शेख रहीम यांच्या वतीने शहरालगत असलेल्या मौलाली पहाडावरील दर्गि परीसरात रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शेख रहीम भाई आणि परिवाराशी गेली अनेक वर्षे सातत्याने सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध असलेले अनेक मित्र या कार्यक्रमास प्रतिवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित रहातात.

बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा इफ्तार कार्यक्रम

अंबाजोगाई शहर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजा इफ्तार चा एवढा मोठा कार्यक्रम क्वचितच होत असेल. शहरातील जातीय सलोखा कायम राखण्यासाठी शेख रहीम भाई हे सातत्याने पुढे येवून अनेक वादग्रस्त प्रकरणात यशस्वी तोडगा काढुनी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळे या कार्यक्रमास हिंदु बांधवांना ही शेख रहीम यांचे विशेष प्रयत्न असतात.

नंदकिशोर मुंदडा आणि मित्र परीवारांची उपस्थिती

शेख रहीम भाई यांनी आयोजित केलेला रोजा इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अलखैर पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, माजी नगराध्यक्ष महादु मस्के आणि शेख रहीम यांचे बंधु हे शहर आणि परिसरातील अधिकाधीक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. यामुळे शेख रहीम भाई परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास हजारो मुस्लिम आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.


१६ एप्रिल रोजी शेख रहीमभाई यांनी आयोजित केलेल्या या इफ्तहार कार्यक्रमास शहरातील हजारो मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी शेख रहीम भाई, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्या सह माजी उपनगराध्यक्ष हकीम भाई, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, नगरसेवक ताहेर भाई, सुजात शेख, सारंग पुजारी, अनंत अरसुडे, वैजनाथ देशमुख, नुर पटेल, शिवाजी दादा कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख चाॅंद यांच्या सह शहरातील अनेक हिंदु बांधवांनी इफ्तहार कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker