“स्वाराती”चा लिपीक ३७हजारांची लाच स्वीकारताना एलसीबीच्या जाळ्यात

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयातील लिपीक ३७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडला असल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणिरा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास ३७ हजार रुपयांची लाच स्विकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील हॉटेल आशियाना मध्ये रंगेहाथ पकडले असल्याची मिहिती मिळते आहे.
लाचलुचपत विभागाच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेली माहिती
▶️ युनिट – बीड ▶️ तक्रारदार- पुरुष वय-31
▶️ आरोपी लोकसेवक :- श्री. अशोक अच्युतराव नाईकवाडे, वय 42 वर्षे, नोकरी, कनिष्ठ लिपिक, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, रा. जोगेश्वरी कॉलनी, चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड.
➡️ लाचमागणी पडताळणी दिनांक 01/03/2023,
➡️ लाच मागणी-80,000/-रु तडजोडीअंती 37,000/- रु स्वीकारण्याचे मान्य केले.
▶️ लाच स्वीकृती दिनांक 10/04/2023
▶️ लाच स्वीकारली :- 37,000/- रुपये
▶️ कारण:- तक्रारदार यांचे मयत सासरे यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तक्रारदार यांचे पत्नीचा नोकरीत नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सादर करून नियुक्ती ऑर्डर काढून देण्यासाठी लोकसेवक यांनी स्वतः पंच साक्षीदार समक्ष 80 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती 37000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे गेट समोरील आशियाना हॉटेल मध्ये आलोसे यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारली असता लाच रकमेसह आलोसे यांना रंगेहाथ पकडले आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी: – श्री.अमोल धस,पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. बीड.मो.क्र. 9823391766.
▶️ युनिट – बीड
▶️ तक्रारदार- पुरुष वय-31

▶️मार्गदर्शक-मा.श्री.संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
9923023361
मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
8788644994
मा. श्री. शंकर शिंदे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. बीड 9355100100.
➡️सापळा पथक :- पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक- गणेश म्हेत्रे ला.प्र.वि, बीड.
*आ.लो.से यांचे सक्षम अधिकारी :- वैद्यकीय अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय, अंबाजोगाई. जि बीड.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-* 9923023361,यावर संपर्क साधावा.