शिवाजी कुलकर्णी श्री वैद्यनाथ रत्न पुरस्काराने सन्मानित


अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा उबाठा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांना वैद्यनाथ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परळी वैजनाथ येथील दि. वा. सेवा संस्थान च्या वतीने शिवाजी कुलकर्णी यांना श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला होता. शिवाजी दत्तोपंत कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या सनमानपत्रात आपण आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिक राहून व समाजात आदर्श निर्माण करून जे उल्लेखनिय कार्य केले त्याचा आम्हास व समाजाला सार्थ अभिमान आहे. तुमचे कार्य पाहता इतरांनीही आपली प्रेरणा घ्यावी व दिपस्तंभा सारखे सतत प्रकाशीत रहावे व आपल्या कार्याचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून आपल्या योगदानाची दखल घेऊन आम्ही व आमची समिती आपणास सन्मान पत्र देऊन परळी पंचक्रोशीतील सर्वोच्च असा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार २०२३ परळी वैजनाथ क्षेत्रात आपणास प्रदान करित आहे. असे म्हटले आहे.
या सन्मानपत्रावर मुख्य संयोजक
दिपक जा. वांजरखेडे, अध्यक्ष बालकिशन सोनी, परळी शहर किराणा असोसिऐशनचे अध्यक्ष रइखबचंद कांकरिया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदरील पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे होते. सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल शिवाजी कुलकर्णी यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.