शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रॅंकींग मध्ये “स्वाराती” राज्यात प्रथम!


महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची उत्कृष्ट आणि सर्वोत्तम अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी संचनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या गोल्डन रॅंकींग मध्ये अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सर्वप्रथम आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने राज्यातील १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा अहवाल प्रत्येक महिन्यात मागवण्यात येतो. या अहवालावरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचीव, कमिशनर, संचालक आणि इतर नियुक्त सदस्य राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोल्डन, सिल्व्हर आणि ब्राॉंझ रॅंकींग ठरवतात. या कॅटॅगिरी मधील गोल्डन रॅंकींग मधील गोल्डन कॅटॅगिरी मध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा क्रमांक प्रथम आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या वतीने ठरवण्यात आलेल्या रॅंकींग ची कॅटॅगिरी खालील प्रमाणे आहे.


गोल्डन रॅंक
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई ५९.२, जे.जे. मेडिकल कॉलेज मुंबई ५८.२
डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर ५६.१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर ५०.३,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव ४५.५,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला ३९.३जे.जे. मेडिकल कॉलेज मुंबई ५८.२
डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर ५६.१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर ५०.३,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव ४५.५,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला ३९.३
सिलव्हर रॅंक


पद्मश्री शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड ३८.१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया ३७.५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा ३६.०
बी जे शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे ३३.६
आयजीएमसी नागपुर ३१.९
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर ३१.६
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे २९.२
ब्रॉंझरॅंक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद २४.४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती २४.०
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ २२.५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुर १७.५,
जेएमसी नागपूर १६.६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली १४.२


अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे अभिनंदन!
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संचनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या रॅंकींग मध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविल्याबध्दल अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे व त्यांच्या सर्व टीमचे शहरातील अनेक नागरिकांनी अभिनंदन केले आहे.