विश्वकर्मा हे सृष्टीचे जनक; राजकिशोर मोदी


अंबाजोगाई शहरातील विश्वकर्मा समाज व समाजातील मुलांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी तथा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहु अशी ग्वाही अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांनी दिली . ते विश्वकर्मा जयांतिनिमित्त आयोजित जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळीजेष्ठ पत्रकार अमर हबीब, माजी उपाध्यक्ष मनोज लखेरा , बबन लोमटे , महादेव आदमाने, प्रभाकर पांचाळ,उमेश पोखरकर, मुकुंदराज संस्थानचे गोविंद महाराज, सुनील व्यवहारे, प्रदीप जागीड,जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, अशोक दळवे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती . या शोभायात्रेत समाजातील अनेक महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते . या शोभयात्रेने अंबाजोगाई करांचे लक्ष वेधून घेतले होते. शोभयात्रेची सांगता मेडिकल परिसरातील विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली . यावेळी अनेक पाहुणे व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .


राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले की विश्वकर्मा यांनी सृष्टीचे निर्माण केले असे मानले जाते. सोन्याची लंका देखील विश्वकर्मा यांनीच निर्माण केली अशी आख्यायिका देखील विश्वात प्रसिद्ध आहे . अशा या सृजन निर्माता , सृष्टी निर्माता विश्वकर्मा यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी केली जात असल्याबद्दल सर्व विश्वकर्मा समाजात युवक, जेष्ठबांधव तथा महिलांचे अभिनंदन यावेळी राजकिशोर मोदी यांनी केले.
पुढे बोलताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपण विश्वकर्मा समाजाच्या व समाजातील मुलांच्या शैक्षणिक तथाआर्थिक उन्नतीसाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असुत असे आश्वासन दिले . विश्वकर्मा समाजबांधव निर्जीव लाकडामध्ये आपली कलाकुसर ओतून त्यात जीव टाकण्याचे काम करतात . निराकार लाकडाच्या ओंडक्यापासून अनेक विध आकाराच्या मूर्ती , विविध वस्तू तयार केल्या जाऊन त्या कलेच्या आधारावरच आपली उपजीविका भागवत असतात. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी आपण बँक , पतसंस्था तसेच अन्य माध्यमातून सदैव सहकार्य करण्याचे देखील ठोस आश्वासन राजकिशोर यांनी समस्त समाजबांधवास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले .


तसेच सध्या सर्वत्र लहान मोठ्या कारखान्यांचे जाळे विणले गेले आहे .या कारखान्यांच्या माध्यमातून देखील समाजातील सुशिक्षित तर यूवकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी युवकांनी तांत्रिक शिक्षण घेतले पाहिजे.अशा शिक्षणासाठी युवकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून समाजातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करू अशी भावना देखील राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली . आगामी काळात विश्वकर्मा बांधवांचे मोठे अधिवेशन होऊ घातले आहे या अधिवेशनास देखील आपल्या परीने सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन याप्रसंगी मोदी यांनी दिले.