विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवरच! सौ. वृषाली गोखले यांची माहिती


ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले हे दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता उपचारांना प्रतिसाद देत नसून त्यांचेवर उपचार सुरु असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सौ. वृषाली विक्रम गोखले यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


मराठी – हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. अशातच गोखले यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यासगळ्या प्रकारावर गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी मीडियासाठी निवेदन दिले आहे. ते आता व्हायरल झाले आहे. यापूर्वी गोखले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटूंबातील सदस्य राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यात त्यांनी अद्याप गोखले हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती.


आता गोखले यांनी आपल्या त्या निवेदनाममध्ये गेल्या २४ तासांपासून गोखले यांची प्रकृती अधिक खालावली असल्याचे म्हटले आहे. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नाही. मात्र डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही त्यांच्या प्रकृतीबाबत ज्या वेगवेगळया प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी म्हटले आहे.
गोखले हे ८२ वर्षांचे असून ते गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोखले हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या मराठी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतची बातमी वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.