महाराष्ट्र
वादळीवाऱ्यासह वीज पडून सायगाव येथे शेतमजूर तर सुगाव येथे म्हैस ठार


तहसीलदार विलास तरंगे यांनी दिले पंचनामाकरुन अहवाल पाठविण्याचे आदेश
अंबाजोगाई तालुक्यात आज पुन्हा एकदा वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामध्ये सायगाव येथे एका शेतमजूराच्या तर सुगाव येथे एका म्हशीचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. यासंदर्भात तहसील विलास तरंगे यांनी संबंधित तलाठी, मंडळ निरीक्षक यांना सुचेना देवून पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रविवार ११ जुन रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांचा प्रचंड कडकडाटासह पाऊस झाला आहे.

