लोकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित बांधवांनी जी चुक केली ती चुक या विधानसभा निवडणुकीत करु नका असा सल्ला केज विधानसभा मतदारसंघात अनेक मराठा, मुस्लिम आणि दलित बांधव मतदारांना करीत असल्याचे आढळून येते आहे.
केज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रचारात मुसंडी मारून जातीधर्माचे राजकारण करणारांना चपराक दिली आहे. फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांच्या तंबुत घबराहट निर्माण झाली आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या विविध प्रचार सभेमध्ये केज मतदारसंघातील अनेक मराठा, मुस्लिम आणि दलित समाजातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून येते आहे.
प्रस्थापित, सर्व सामान्य, गोरगरिबांच्या गाठीभेटी घेऊन नमिताताई यांनी गुरूवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी केज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सकाळी चंदन सावरगांव, कुंबेफळ, जानेगांव व उंदरी या गावांना भेटी दिल्या. नागरिकांसोबत विविध विकास कामांच्या अनुषंगाने संवाद साधत, येत्या विधानसभा निवडणुकीत मला मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच काल बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मस्साजोग, आरणगाव, काळेगावघाट, हनुमंत पिंपरी, कापरेवाडी, बोरगाव व भोपला या गावांना भेटी दिल्या. या प्रचार दौऱ्यात सर्व मतदार बंधू, भगिनी, ग्रामस्थांशी संवाद साधला. येत्या विधानसभा निवडणुकीत मला मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते. आ. नमिता मुंदडा यांच्याकडे मतदारांचे प्रश्न विकासकामांचा अजेंड, दूरदृष्टीचे नेतृत्व दिसू लागल्याने मतदारांनी आ. नमिता मुंदडा यांना नेहमीच आपले मानले आहे. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी केज मतदारसंघात प्रचारात आघाडी घेऊन विरोधकांना घाम फोडला आहे.
आता मतदारांनीच नमिता मुंदडा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून केज मतदारसंघातील चांद्यापासून बांद्यापर्यंत, शहराच्या गल्लीपासून वेशीपर्यंत नमिताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, “ओन्ली नमिताताई” अशी जोरदार चर्चा होत आहे. आ. नमिता मुंदडा यांना गोरगरीब, दीन दलित, मुस्लिम, मराठा, ऊसतोड कामगार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसमभाव आणि सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालणारे विकासप्रिय नेतृत्व नमिताताईंना निवडून देण्यासाठी केज मतदारसंघातील मतदार राजा एकवटला आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.