महाराष्ट्र
राजनंदिनी पाटील हीने मिळवले संस्कृत मध्ये १०० तर इंग्रजी मध्ये ९६ टक्के गुण


पत्रकार रमाकांत पाटील यांची मुलगी राजनंदिनी ने सिध्द केली शैक्षणिक गुणवत्ता
नुकत्याच झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील दैनिक सामना या वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी तथा प्रसिध्द एआयसी अभिकर्ता पत्रकार रमाकांत पाटील यांची मुलगी राजनंदिनी हीने आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करीत यश प्राप्त केले आहे. तिच्या या अलौकिक यशाबद्दल राजनंदिनी व रमाकांत पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी
येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई येथील दहावी वर्गात सेमी इंग्रजी मध्ये शिकणारी व गीतेचा पंधरावा अध्याय मुखपाठ असणारी विद्यार्थ्यांनी कुमारी राजनंदनी रमाकांत पाटील हीने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९३.४०% गुण प्राप्त केले असून इंग्रजी विषया मध्ये १०० पैकी ९६ तर संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. सदरील यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

