Uncategorized
रमेश कापसे यांचे -हदयविकाराने निधन


अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश गुंडप्पा कापसे यांचे -हदयगती थांबल्याने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.
रमेश गुंडप्पा कापसे हे किनगाव ता. अहमदपुर जवळील अदनुर या गावचे मुळ रहिवासी. त्यांचे वडील काही कारणानिमित्ताने अंबाजोगाई येथे राहण्यासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले.
रमेश कापसे हे कमी वयातच व्यवसायात शिरले. खारमुरी विकण्याच्या साध्या गाड्या पासून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. पुढे काही वर्षे त्यांनी हॉटेल व्यवसाय ही केला. या दोन्ही व्यवसायात आपले नांव कमावल्या नंतर त्यांनी मोंढा विभागातील मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरु केला आणि या व्यवसायात ते स्थिरावले.


रमेश कापसे हे व्यसायासोबतच धार्मिक कार्यात ही सदैव अग्रेसर असत. गजानन महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाची आणि त्यानंतर सकाळच्या महापुजा व महाप्रसादाची जबाबदारी गेली अनेक वर्षांपासून ते स्वतः सांभाळत असत. शेगाव येथील गजानन महाराजांचे ते निस्सिम भक्त होते. अलिकडे दोन दिवसांपुर्वी कपीलधार येथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामी होती त्यावेळी ते आपल्या मित्रांसोबत दर्शनासाठी गेले होते.

