महाराष्ट्र
रक्षा मंत्रालयाने दिली योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सैनिकी शाळेला मंजूरी!


स्वातंत्र्य पुर्व काळात स्वातंत्र्य चळवळ गतीमान करण्यासाठी या विभागातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे हा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेस केंद्रीय रक्षा मंत्रालयाने सैनिकी स्कुल सुरु करण्याची परवानगी दिली आहे.


केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मराठवाड्यातील ७० शिक्षण संस्थांनी सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी रक्षा मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. अलिकडेच रक्षा मंत्रालयाच्या काही अधिका-यांनी या संदर्भात योगेश्वरी शिक्षण संस्था व मराठवाड्यातील इतर काही शिक्षण संस्थेस भेट देवून शाळा सुरु करण्यासंदर्भात चाचपणी केली होती.
साडेतीन एकर जागेत उभारणार शाळा!
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने या अधिका-यांना महात्मा जोतिबा फुले वसतिगृहाशेजारील मोकळी असलेल्या साडे तीन एकर जागा या नियोजित सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी दाखवली होती. सदरील पाहणीस काही महिने पुर्ण झाल्यानंतर आज केंद्रीय रक्षा मंत्रालयाचे एक पत्र योगेश्वरी शिक्षण संस्थेस प्राप्त झाले आहे.

