स्त्री जातीचे मृत अर्भक प्रकरणी कुमारी मातेसह २ महिला पोलिसांच्या ताब्यात


आठ दिवसापु्र्वीच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या शौचालयात बकेट मध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह व दोन महिलांना पोलीसांनी चौकशी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणीचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
स्वाराती रुग्णालय अपघात विभागाच्या शौचालयात दिनांक 2.12. 22 रोजी सकाळी नऊ वाजेचे दरम्यान येथील सफाई कर्मचारी मोहन राठोड साफसफाई करत असताना लाल रंगाच्या बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मर्त अर्भक त्याला दिसून आले होते.
याची माहिती मोहन राठोड याने वरिष्ठांना सांगितल्यानंतर वरीष्ठांच्या सुचनेनुसार मोहन याने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे सदरील मृत अर्भक प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाणे येथे आज्ञत आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 527/2022 कलम 318 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत कांदे व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले यांनी करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मंगेश भोले व सहाय्यक फौजदार भागवत कांदे यांनी अपघात विभागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता सदरील तारखेस स्वारातीच्या अपघात विभागात तीन महिला संशयितरत्या फिरतांना दिसल्या.


पुढे अपघात विभागांमध्ये आलेल्या सर्व रेकॉर्डची तपासणी केली असता त्यांना पिंपरी नाव असलेले छोटी चिठ्ठी आढळल्यामुळे त्यांनी या तपासकामी अंबाजोगाई तालुका, परळी तालुका, केज तालुका आणि धारूर तालुक्यातील गावांमध्ये पिंपरी किंवा पिंपरीला जोड नाव असणा-या गावांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधामध्ये त्यांना जिल्ह्यातील एका पिंपरी नावा अगोदर इतर नाव असलेल्या गावी पोचले असता सीसीटीव्ही मधील फुटेज मध्ये दिसणारे चेहऱ्यासारखे तीन चेहरे त्यांना या गावात आढळून आल्यामुळे त्यांनी धारूर येथील महिला पोलीस बोलवत सदरील सज्ञाणपण कुमारी असलेल्या मुलीस विचारपूस केली असता 2 डिसेंबर रोजीच्या रात्री आपण स्वाराती रुग्णालयात आल्याचे कबूल केले.
सदरील 19 वर्षे मुलीचे पोट दुखू लागल्यामुळे गावाहून मुलीची आई व शेजारील महिलेस सोबत घेत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी अपघात विभागामध्ये डॉक्टरांना दाखवले असल्याचे कबुली दिली. डॉक्टरांनी सदरील मुलीस इंजेक्शन देऊन इतर औषध उपचार केला. मात्र थोड्या वेळाने सदरील मुलीगी अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या शौचालयात बाथरूमला जाते म्हणून गेली व बराच वेळ बाथरूम मध्येच थांबली. सदरील मुलीस असाहाय्य वेदना होत असताना शौचालयातच ती बाळंत झाली आणि सदरील मुलीने मग हे स्त्री जातीचे जन्मलेले अर्भक येथील लाल रंगाच्या बकेट मधील पाण्यात टाकले. यावेळी हे अर्भक मृत होते की जिवंत होते हे आता पोलीस चौकशीत समोर येणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी नवू वाजता सफाई कर्मचारी मोहन राठोड सफाईसाठी सदरील शौचालयात गेला असता लाल बँकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक आढळुन आले आणि रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.


सदरील तपासकामी सहाय्यक फौजदार कांदे व पोलिस शिपाई भोले या जोडगळीने सीसीटीव्हीचे फुटेज, व कुठलाच सुगावा नसताना डिलिव्हरी वाढ ते अपघात विभाग यातील कागदपत्रे, सीसीटीव्हीचे फुटेज शोधून अर्भक टाकलेल्या लोकांना शोधून काढण्याचे मोठे जिक्रीचे काम आठ दिवसातच पुर्ण केले. या जोडगोळीने पिंपरी नाव असलेल्या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात दिवस-रात्र चौकशी करत करत अखेर या कुमारी मातेस व सहकार्य करणाऱ्यांना महिलांना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हजर केले. आता या प्रकरणी पुढील कारवाई सुरु होणार आहे.
सदरील स्त्री जातीच्या अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेची वैद्यकीय तपासणी, अर्भकाची तपासणी औरंगाबाद येथे डीएनए व वेगवेगळ्या तपासणी केल्यानंतरच अर्भकाची पूर्ण माहिती मिळणार आहे.
दरम्यान सदरील कुमारी मातेचे शेजारील गावातील चार पाच मुलांचा पिता असलेल्या तरुणाशी प्रेम संबंध जुळले व त्यातूनच तिची मासिक पाळी बंद होऊन दिवस गेले असल्याचे समजते. सदरील मुलीने ही बाब इतरांपासून लपवून ठेवली मात्र ज्यावेळेस पोट दुखी असहाय्य झाली तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. व पुढील सर्व प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणी सर्व तपास पुर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होतील असे तपास प्रमुख सहाय्यक फौजदार कांदे यांनी सांगितले.