मान्यवरांच्या उपस्थितीत अल-फलाह नागरी पतसंस्थेचा शानदार शुभारंभ


गरीबांना बिनव्याजी कर्ज मिळणे आनंददायी बाब; मौलाना अफसर खान
गरीब नागरिकांसाठी बिनव्याजी अर्थसहाय्य मिळणे यासारखी दुसरी कोणतीही बाब नाही असे मत मौलाना अफसर खान साहब यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाई शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने निर्मित अल-फलाह नागरी सहकारी परसंस्थेचा भव्य व शानदार शुभारंभ प्रसंगी बोलत होते .या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून जनाब सय्यद शाफिक हाश्मी (चेअरमन , राहत अरबन क्रेडिट को ऑप सो लि बीड) तर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मौलाना अफसर खान, प्रमुख पाहुणे म्हणून जनाब सय्यद अन्वर जाफर, तसेच ऍड सुनील सौंदरमल,(आधार मल्टिस्टेट चे संस्थापक) , सय्यद अन्वर जाफर (चेअरमन, दौलत ना स पतसंस्था परळी) हे लाभले होते. तसेच
यांच्यासोबत व्यासपीठावर अल- फलाह पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी ,अध्यक्ष खालेद चाऊस , उपाध्यक्ष हाजी महेमुद, काझी महेमुद (बीड), तसेच सरकार न्यूज चे संपादक सिराज आरजु व दैनिक तामिर चे मगदूम काझी , हाजी खालेक आदीजण उपस्थित होते .
या शुभारंभ प्रसंगी प्रथमतः अल फलाह नागरी सहकारी पतसंस्थेचे फीत कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राजस्थानी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे शुभेच्छा पर मनोगत तसेच प्राथमिक स्वरूपात पाच ग्राहकांना अर्थसहाय्य म्हणून चेक वाटप करण्यात आले. नजीर पठाण या प्रथम ग्राहकास स्कुटी ची चावी यावेळी हस्तांतरित करण्यात आली .


कार्यक्रमाच्या प्रस्तविकामध्ये पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी अल-फलाह ना. सह. पतसंस्था सुरू करण्याचा उद्देश विषद केला . आजच्या घडीला सामान्य नागरिकास बिनव्याजी पतसंस्थेची आवश्यकता होती . ती आज अल-फलाह या पतसंस्थेच्या माध्यमातून पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले . याचा फायदा शहरतील सामन्यातील सामान्य तथा गरीब नागरिकास होणार असून त्याचा लाभ ग्राहकांनी घेण्याचे आवाहन राजकिशोर मोदी यांनी केले . आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून एक लाख लोक जोडले गेले असल्याचे देखील मोदी यांनी अभिमानाने स्पष्ट केले . नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही पतसंस्था मैलाचा दगड ठरेल अशीही भावना राजकिशोर मोदी यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केली .


पतसंस्थेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अंबाजोगाई शहरात एक आर्थिक , सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळ उभी करण्यात राजकिशोर मोदी यांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार सोफी अहमद रजा आरेफ साहब यांनी काढले . बीड येथील सरकार न्यूज चे संपादक सिराज आरजु यानी देखील आपल्या भावना व्यक्त करतांना स्पष्ट केले की आजच्या काळात बिनव्याजी बँक किंवा पतसंस्था सुरू करणे हे मोठे धाडसाचे काम आहे . अश्या संस्थांमधून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्या सर्व लोकांनी नियमितपणे त्याची परतफेड केली असल्याचे नमूद केले . यापुढेही घेतलेले पैसे कोणीही चुकवणार नाही याचीही ग्वाही सिराज आरजु यांनी दिली . या उद्घाटन प्रसंगी हाजी खालेक यांनीही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले .
मुस्लिम बांधवांसाठी स्वतंत्र पतसंस्था हे धैर्याचे काम; ऍड. सौंदरमल
आधार मल्टिस्टेट चे संस्थापक ऍड सुनील सौंदरमल यांनी आपले विचार मांडताना मुस्लिम बांधवांसाठी एक स्वतंत्र पतसंस्था असावी असा विचार मनात येणे हे देखील मोठे धैर्याचे काम असल्याचे सांगितले .आज कुठलीही बँक किंवा पतसंस्था चालविणे हे अतिशय कठीण काम असल्याने ते म्हणाले . राजकिशोर मोदी हे सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व आहे . तसेच आपणाकडून पतसंस्थेस कुठलीही मदत लागली तर ती आपण करण्यास सदैव तत्पर राहू अशी देखील ग्वाही ऍड सुनील सौंदरमल यांनी दिली .
मुस्लिम समाजात व्याज देणे व व्याज घेणे हा सर्वात मोठा गुन्हा; मौलाना अफसर खान
मुस्लिम समाजात व्याज देणे व व्याज घेणे हा सर्वात मोठा गुन्हा
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप जनाब मौलाना अफसर खान यांनी केला . गरीब नागरिकास बिनव्याजी अर्थसहाय्य मिळणे यासारखि आनंददायी बाब नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच इस्लाममध्ये व्याज घेणे व व्याज देणे हा सर्वात मोठा गुन्हा असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले . तसेच मुस्लिम बांधवांसाठी राजकिशोर मोदी यांनी पतसंस्था सुरू केली याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले . या पतसंस्थेचा लाभ सर्वां बांधवानी घ्यावा असे आवाहन केले.तसेच घेतलेले अर्थसहाय्य वेळेवर परत करून पुढील ग्राहकास त्याचा फायदा करून द्यावा असेही आवाहन मौलाना अफसर खान यांनी केले .राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला मौलाना अफसर खान यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या .
या कार्यक्रमास पतसंस्थेचे सर्व संचालक, माजी उपनागराध्यक्ष मनोज लखेरा, हाजी दगडू भाई, माजी नगरसेवक महादेव आदमाने ,समियोद्दीन खतीब, धम्मा सरवदे,रिजवान भाई, अकबर पठाण, अजीम कुरेशी, मुशीर काझी,गफार भाई, मोमीन मुजफ्फर, खयामिद्दीन काझी, फारुख भाई , पत्रकार अ र पटेल, राजेंद्र मोरे, सुनील वाघळकर , शेख नजीर, वाजेद पटेल, सायगाव येथील फताउल्लाह हाश्मी, खिलाफत अली,सलीम पटेल यांच्यासह शेकडो ग्राहक व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नईम सर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार पतसंस्थेचे संचालक अजीम जरगर यांनी व्यक्त केले .