भारत जोडो यात्रा; राहुल गांधी यांना दिल्या १ लाख झाडांच्या बिया निसर्ग शाळेने राबवला उपक्रम


भारत जोडो यात्रा 67 व्या दिवशी हिंगोली शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी निसर्ग शाळेचे प्रवर्तक अण्णा जगताप यांच्यासोबत ‘ निसर्ग आणि मुले ‘ या विषयावर चर्चा केली. निसर्ग शाळे तर्फे राहुलजी गांधी यांना एक लाख झाडांच्या बिया देण्यात आल्या.
भारत जोडो यात्रे दरम्यान हिंगोली पासून काश्मीर पर्यंत चालत असताना ह्या झाडांच्या बिया राहुलजी लहान लहान मुलांना देणार आहेत. ज्यात हादगा, चिंच, स्टोरी, आवळा, जांभूळ, सिताफळ, रामफळ, लाल हादगा, आवरा, कडुलिंब, आवळा इत्यादी झाडांच्या बिया आहेत. निसर्ग विषयक जाणीवा-नेणीवा मुलांच्या अंगी निर्माण व्हाव्यात व माती विषयी निष्ठा निर्माण होण्यासाठी या बिया वाटल्या जाणार आहेत.
कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत निघालेली ही भारत जोडो यात्रा हळूहळू मोठे रूप धारण करत आहे. भारतातील दिन, दुबळ्या, दुर्लक्षित जनसमुहाची आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत यात्रा पुढे पुढे जात आहे. सोबतच भारतातील अनेक वेगवेगळ्या चळवळीचे लोक यात्रेत सहभागी होइत आहेत. त्याचेच एक प्रतीक म्हणून मागील दोन वर्षापासून अण्णा जगताप यांनी सुरू केलेली निसर्गाची शाळा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे भारतातील आकरा राज्य आणि जगातील बावीस देशापर्यंत पोहोचीती झाली आहे.ही शाळा मुलांच्या निरोगी जगण्यासाठी झाड, पाणी, नदी, नाले, डोंगर, द-या एकूणच निसर्ग विषयक जाणीव-नेणीवा पेरते म्हणून राहुल गांधी यांनी निसर्ग शाळेशी संवाद साधला.


” यात्रेत प्रवास करत असताना किमान दहा हजार मुलांनी भेट झाली. तेव्हा मुलांमधे फक्त पाच भविष्यासाठी ध्येय आहेत असे कळाले. ज्यात डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक,प्रशासकीय अधिकारी, सैनिक होणे. हे जास्त प्रमाणात आहेत. परंतु कृषी, संशोधन, कले सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मुले इच्छुक दिसली नाहीत. अशावेळी निसर्ग शाळेच्या माध्यमातून तुमच्यासारखा शिक्षक हे काम करतो आहे. खूप महत्त्वाचे आहे. यात्रेदरम्यान ह्या बिया नक्कीच मुलांच्या तळ हातावर देऊन मुलांच्या मनात रुजवेल ” असे राहुलजी गांधी म्हणाले.
उद्याचा भारत ह्या मुलांच्या मध्ये आहे. या यात्रेच्या निमित्ताने निसर्गविषयक निष्ठा पेरण्याचे काम या बियांच्या माध्यमातून होईल. मुले सर्जनशील असतात. बाल वयात त्यांच्या वरती झालेले संस्कार हे जन्मभरासाठी पुरतात. बीज लावतात कसं ? ते उगवतं कसं ? ते वाढत कसं ? त्याला पानं, फुलं, फळं येतात कशी ? याविषयी लहान वयातच जाणीव निर्माण झाली तर मुले निसर्गाचे अनुयायी बनतील. ही यात्रा अनेक विचारांची प्रेरणा निर्माण करत आहे. हे निरोगी जगण्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असे राहुल जी मानतात.
याचवेळी यात्रेदरम्यान नैसर्गिक शाळेच्या माध्यमातून बाल दिनाच्या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले. यात्रे दरम्यान झाडांची रोपे हातात घेऊन भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. या उपक्रमासाठी संदेश भंडारी, पुष्पराज देशपांडे, वरून सर राजा कदम, प्रेमानंद शिंदे, बाळासाहेब राऊत, प्रा. ज्ञानोबा ढगे.हेमंत बेले, जगन जामगे, अवनी, शेरवानी, ऐश्वर्या, ऋषीद, सारण्या, रियांश, समर्थ, स्वराज, प्रवीण, शितल, नीता जगताप, कडूबाई, वर्षा पडोळे, संजीवनी थोरात, सावित्री गायकवाड, सुषमा पिसे यांनी मेहनत घेतली.
निसर्गाची शाळा