भारतातील नामवंत १०० संगीतकारात ओंकार रापतवार यांचा समावेश!


भारतातील नामवंत १०० संगीतकारांमध्ये अंबाजोगाई येथील नवोदित संगीतकार ओंकार रापतवार यांचा समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॉक्स या इ मॅगझिन ने यांची नोंद घेतली असून या बाबतचे प्रमाणपत्र ही ओंकार रापतवार यास प्राप्त झाले आहे.
अंबाजोगाई येथील ओंकार रापतवार हा शालेय शिक्षणापासून संगीत क्षेत्राशी जोडला गेला आहे. संगीतातील प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथील प्रकाश बोरगावकर यांच्या तबला अकादमी मध्ये पुर्ण केल्यानंतर संगीतातील अतीउच्च शिक्षण त्याने चेन्नई येथील अ. आर. रहेमान यांच्या म्युझिक स्कुलमध्ये पुर्ण केले आहे. याव्यतिरिक्त संगीत क्षेत्रातील अनेक परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या आहेत.


फॉक्स या आंतरराष्ट्रीय इ मॅगझिन ने घेतली दखल
संगीत क्षेत्रातील अतीउच्च शिक्षण घेतलेल्या ओंकार रापतवार याने मुंबई ही कर्मभूमी ठेवत अंबाजोगाई येथे दोन वर्षारापूर्वी बॉम म्युझिक स्टुडिओ ची उभारणी केली. यानंतर अलिकडेच त्याने बॉम म्युझिक स्कुल ही सुरु केले आहे. अत्यंत कमी वयात संगीत क्षेत्रातील या नेत्रदीपक कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॉक्स या इ मॅगझिन ने घेतली असून देशातील मान्यवर १०० संगीतकारांमध्ये ओंकार रापतवार यांचा समावेश करुन त्याला त्याबाबतचे प्रमाणपत्र ही पाठवले आहे.
ओंकार रापतवार याने अत्यंत कमी वयामध्ये संगीत क्षेत्रातील मिळवलेल्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल त्यांचे आ. नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, ज्येष्ठ संगीतविषयक प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ गायिका सौ. राणीताई वडगावकर यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.