भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला !


भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांनी अलिकडील घडलेल्या घटनेचा नामोल्लेख ही न करतांना कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजप व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलतांना हा सल्ला दिला.
बीड जिल्ह्यातील मागील पंधरा दिवसांत भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात दोन विविध कार्यक्रमांना येवून गेले. या दोन्ही कार्यक्रमांना पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रतिमा मुंडे यांची अनुपस्थित होती. जिल्ह्यात झालेल्या या दोन ही कार्यक्रमास भाजपाच्या राष्ट्रीय सतीश पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ही सर्व कारस्थाने भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जाणीवपूर्वक करतात असा दावा मुंडे समर्थक करतात.


मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपा आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील प्रचार सभांसाठी पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे या उपस्थित राहणार असल्याचं पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आल्यानंतर ही पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही? या बद्दल शंका व्यक्त करण्यात येत होत्या. पण २१ जानेवारी रोजी भल्ययापहाटेच पंकजा मुंडे यांना सोबत घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबाद विमानतळावर उतरले आणि या संपुर्ण चर्चेला पुर्णविराम मिळाला.
आता भाजपा राष्ट्रीय सतीश या मेळाव्यातील भाषणात मागील दोन ही घटनेसंदर्भात नेमके काय बोलतील यांचे तर्कवितर्क सुरु झाले. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात उमेदवार प्रा. किरण पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करुन मागील पंधरा दिवसांत घडलेल्या दोन्ही कार्यक्रमांचा उल्लेख न करता या संदर्भात अतिशय मार्मिक भाष्य केले.
राजकीय जीवनात चढ उतार प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. गोपिनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भाजपाला ताकद देवून सर्वप्रथम राज्यात सत्ता करण्याची संधी उपलब्ध करुन दिली तरीही त्यांच्या वाटेला संघर्ष आलाच होता. त्यावेळेस तर देशात अटलजी सारख्या प्रगल्भ वैचारिक शक्ती असलेल्या पंतप्रधानांचे देशावर राज्य होते. आता तर तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे देशावर राज्य आहे! राजकारणात आलेल्या प्रत्येक व्यक्ती घ्या जीवनात चढ उतार येत असतातच आज कोणाची चलती असते तर उद्दा कोणा दुसऱ्याचीच चलती येते. तेंव्हा अशा लहान लहान खेळींना फार मनावर घेवून चालत नाही, मी मनावर घेत नाही तर तुम्ही तरी का मनाला लावून घेतात, असे मायुस चेहरे करुन फिरु नका, अजून काही दिवस धीर धरा पुन्हा आपलेही दिवस येतील, कार्यकर्त्यांनो जरा सबुरीने घ्या असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.


आपल्या अत्यंत शांत, संयमी आणि मार्मिक भाषणात पंकजा मुंडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या सोबत फिरले यांचा त्यांना किमान दोन सहीने तरी त्रास होईल असे हसत हसत सांगत पक्षांतर्गत मदभेदाचे किती आणि कसे परिणाम होवू शकतात यावर ही टिप्पणी केली.
संघर्ष हा माझ्या जीवनात कायम आलेला आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणा-या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम संघर्ष करीत राहील. मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे, त्यांना ही आयुष्यभर संघर्ष करावा लागला मी ही तुमच्यासाठी आयुष्यभर संघर्ष करण्यासाठी तयार आहे. मी उतरणार नाही, मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही… आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ तुमच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करीत राहील, फक्त तुम्ही माझ्या सोबत कायम रहा अशी भावनिक साद ही पंकजा मुंडे यांनी यावेळी घातली!