भक्तीनिवास समोरील रस्त्यावरील घाणीमुळे भाविक भक्तांमध्ये संताप


भक्तनिवास समोरुन शहरालगत असलेल्या दासोपंत समाधी, आद्दकवी मुकुंदराज स्वामी व माता रेणुकादेवी मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरील घाण व कच-या़च्या ढिगा-यांच्या र्गंदुधी मुळे भाविक भक्तांमधे संताप निर्माण झाला असून सदरील घाण त्वरीत उचलुन समस्येला कायमस्वरूपी प्रतिबंध लावावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
युवा सेनेच्या वतीने दिले निवेदन
अंबाजोगाई शहर हि संतांची भुमी, अध्यात्मिक शहर असुन स्वच्छता अभियान मोहिमेत 3 वेळेस पुरस्कार मिळालेल्या शहरातील धार्मिक मंदिर परिसरातील व पर्यटन स्थळाच्या मुख्य रस्त्यावरील उघड्या जागेवर प्रचंड प्रमाणात शहरातील घाण कचरा , दुर्गंधी कोंबड्यांचे पंख, दारूच्या बाटल्या ह्या योगेश्वरी देवी मंदिर परिसरातील, भक्तनिवास समोरील श्री मुकुंदराज स्वामी महाराज रस्त्यावर हा घाणीचा झालेला उद्रेक नागरीकांच्या आरोग्यावर उठला असुन त्या मुळे भाविक भक्तांच्या मनामधे सुध्दा संतापाचा उद्रेक निर्माण झाला असून. या ठीकाणच्या समस्येवर तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात यावे या बाबतचे पत्र अंबाजोगाई युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर सह सहकारी पदाधिकाऱ्यांकडून देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार साहेब यांना व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरच घाण
योगेश्वरी देवी मंदिर रोड ते मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधी रोड या मार्गावर भक्तनिवास समोर गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील घाण कचरा दारूच्या बाटल्या व कोंबड्यांचे पंख व मांसाहार घाण या ठीकाणी मंदिराजवळील रस्त्यावर टाकल्याने दुर्गंधी पसरत आहे शहरातील अनेक नागरीक दररोज याच ठिकाणावरून पर्यटक लहानमुले, माॅर्निंग वाॅकला सकाळी जाणारे नागरीक, मंदिरास जाणारे भाविक भक्त तसेच अनेक ग्रामीण भागातील नागरिक अशे हजारो जण दररोज या रस्त्यावरून प्रवास करत असतात त्यांच्या सर्वांच्याच आरोग्यास ह्या घाणीच्या समस्येने धोका निर्माण झालेला असल्याने या ठीकाणी तात्काळ स्वच्छता करून ,रस्ता स्वच्छ व सुंदर करावा या मुळे भाविक भक्तांच्याही भावना दुखावणार नाहीत. सदरील परिसरातील ठीकाणी सुचना फलक लावण्यात यावे व या ठीकाणी घाण कचरा टाकण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करून स्वच्छता करण्यास नगरपरिषद कार्यालयास अधिसूचित करावे अशी आग्रही मागणी या वेळी अंबाजोगाई युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांनी तहसीलदार साहेब यांच्या कडे केली आहे. तहसीलदार साहेब यांना निवेदन देते वेळेस युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांच्यासह युवासेना शहर प्रमुख आकाश सुरवसे, काॅलेज कक्ष प्रमुख निलेश जोगदंड, कृष्णा शेळके हे हि यावेळी उपस्थित होते..!