बाबरांच्या ६ व्या वंशजांनी राम मंदिर पाडल्याबद्दल मागितली होती माफी!


राम मंदिर पाडल्याबद्दल बाबर घराण्यातील ६ व्या पिढीतील माफी मागितली होती. राम मंदिर निर्माण आणि रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापनेच्या. पार्श्वभूमीवर सदरील माफी मागितल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्ला यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत असतांनाच संपुर्ण देशभर एक उत्साह आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रॉयल मुगल फॅमिली ऑफ हिंदुस्थान घराण्यातील सहावे वंशज मुगल बहादुर शहा जफर चे मुतवल्ला आणि मुगल वक्फ प्रॉपर्टीजचे केअर टेकर इंपारीयर बादशहा जफर चे नातु प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुस्सी यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज, संत महासभा मंदीर मार्ग, नवी दिल्ली यांना एक पत्र लिहून बाबर चे सेनापती मीरबाकी यांनी १५२८ मध्ये आयोध्या येथील भगवान श्रीराम यांचे विशाल मंदिर उध्दवस्त केल्याबद्दल समस्त हिंदू बांधवांची एक पत्र लिहून क्षमायाचना मागितली असल्याचे पत्र समाजमाध्यावर व्हायरल झाले आहे.


सदरील पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मी मुगल शाही परिवारातील बाबर तथा बहादुर शहा जफर यांच्या सहाव्या पिढीचे वंशज प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुस्सी आपल्या अंतर्मनातील आवाजाने लिहून देत आहे की, माझे पुर्वज बाबर चे सेनापती मीर बाकी यांच्या कडून सन १५२८ मध्ये आयोध्या मधील भव्य राम मंदिर तोडण्याचे निंदनीय, जाहिलाना, कुकृत्य करण्यात आले असून या कृत्याबद्दल जगातील सर्व हिंदू बांधवांचे पुर्ण होशहवास व दिलं की गहराईयोंसे क्षमा याचना करीत आहे असे म्हटले आहे.
या पत्रात पुढे असे ही म्हटले आहे की, माननीय सुप्रीम कोर्टात श्रीराम जन्मभूमी विवाद प्रकरणातील सर्व मुस्लिम पक्षकारांना विनंती करतो की, त्यांनी आपला श्रीराम जन्मभुमीवर बाबरी मशीद च्या नावाने राजकारण करणे बंद करावे व आपल्या खोट्या तक्रारी वापस घेऊन श्रीराम जन्मभुमीवर भव्य श्रीराम मंदिर उभे करण्याचा मार्ग मोकळा करावा, जेणे हिंदु-मुस्लिम बांधवातील सद्भावना कायम राहील.


या पत्राद्वारे मी जाहीर करतो की, माझे पुर्वज बाबर यांनी आपल्या वसईयत मध्ये या घटनेला एक कलंक समजला होता, तथा त्यांनी हिंदुस्थान मधील संत महात्मा यांचा सन्मान करा, मंदिरांची हिफाजत करा एंव सर्वांना एक सारखा न्याय करा असे लिहून ठेवले आहे.
शेवटी बाबर एंव बहादुर शहा जफर यांचा वंशज होण्याचे नात्याने पुन्हा एकदा समस्त हिंदू बांधवांची क्षमायाचना करून सोबत श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने सहयोग देण्याचे, मंदिर निर्माण करण्याचे काम सुरु असताना एक सोन्याची वीट आपल्या परिवाराकडून देण्यात येईल असा वायदा करून ही वीट हिंदु-मुस्लिम समाजातील एकतेसाठी एक माईलस्टोन सिद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला होता.
या पत्रावर १६ सप्टेंबर २०१८ हा दिनांक असून यावर बाबर घराण्यातील सहावे वंशज प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुस्सी यांची स्वाक्षरी आहे.