महाराष्ट्र

बस स्थानकात चो-या करणाऱ्या दोन महिला गजाआड; ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन महिलांसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई बस्थानकात चो-या करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी या प्रकरणात दोन महीलांसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासंदर्भात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घोळवे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक घोळवे पुढे म्हणाले की, अंबाजोगाई बसस्थानक येथे लग्न सराईच्या गर्दीचा फायदा घेवून महीलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे, पर्स मधील पैसे, दागिणे चोरीचे गुन्हे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला ६ गुन्हे दाखल होते. बसस्थानक येथे होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालणयासाठी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर – पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी शर्तीचे प्रयत्न करून अंबाजोगाई विभाग अंतर्गत पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.
सदर पथकांनी गुन्हे घडल्याचे ठिकाणचे सी सी टि व्ही फुटेज, गोपनिय बातमीदार नेमुन, शर्थीचे प्रयत्न करून १) मिराबाई दत्तात्रय काळे वय ४० वर्षे रा. जायकवाडी सरकारी दावाखान्याचे पाठीमागे सोनपठे जि. परभणी, २) सौ पुजा उदयराज भोसले वय २१ वर्षे रा. पोंडुळ ता. सोनपेठ जि. परभणी ३) रविद्र प्रकाश ऊंडानशिव वय ४४ वर्षे रा. गंगाखेड जि. परभणी यांना अटक करून त्यांचेकडून पोस्टे अंबाजोगाई शहरच्या ४ गुन्हयातील चोरी गेलेले ६ तोळे सोने किमंती ३,३९,०००/- व नगदी रोख ५२,०००/- रुपये असे एकुण ३,९१,०००/- (तीन लाख ऐक्यान्नव हजार) रुपयाचा माल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग अंबाजोगाई, अनिल चोरमले, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, चाँद मेंडके पोलीस उप निरीक्षक पोस्टे अंबाजोगाई शहर, पोह/ ४२८ अर्सुळ, पोह/ ९७३ घोळवे, पोह/ १४८५ वडकर, पोअं/ २०२० नागरगोजे, पोअं/८९० चादर, पोअं / १७० काळे, पोअं/ ५०९ लाड, मपोअं/ २०८८ सांळुके, तसेच पोह भास्कर केंद्रे, सचिन सानप, तेजस वाव्हळे यांनी केली आहे. भविष्यातही चोरी करणारे, गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमाननाऱ्या व्यक्ती विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे संकेत नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक बीड व अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी दिले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker