महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परीषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मेडिया शाखेचे अंबाजोगाई विभागाचे अध्य अभिजित लोमटे यांना एका प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती अभिजित लोमटे यांनी समाज माध्यमांवर दिली आहे. सदरील घटनेसंदर्भात आज सकाळी ११ वा. शहरातील सर्व पत्रकारांची बैठक घेऊन या बैठकीत सुनील नागरगोजे यांच्या विरोधात तक्रार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
नांदेड येथील पत्रकार संजय सुर्यवंशी यांचीबातमी का टाकली म्हणून शीवीगाळ
नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सूर्यवंशी यांना बातमी का टाकली म्हणून सर्व असशील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार बाबुराव कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण निषेध तर करतच आहोत परंतु आपल्या अंबाजोगाई शहरात डिजिटल मीडिया परिषद चे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांना बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजे यांनी व्हायरल क्लिप ची बातमी का केली म्हणून थेट गोळी मारण्याची धमकी चा स्वतः बडर्तफ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आज सकाळी ११ वाजता पत्रकारांची बैठक
माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे उद्या सकाळी अकरा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे एकत्रित जमून कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सर्वांमध्ये चर्चा करून निवेदन तयार करायचे आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अभिजित लोमटे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.