नियमित योग करण्यामुळे -हदयरोगाला दुर ठेवता येवू शकते


जागतिक -हदयरोग तज्ञ पद्मश्री डॉ.एस. सी. मनचंदा यांचे मत
नियमित योग करण्यामुळे -हदयरोगावर नियंत्रण मिळवता येवू शकते असे मत नवी दिल्ली येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ आणि योगाभ्यासाचे संशोधक पद्मश्री डॉ. एस. सी. मनचंदा यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. दिपक कटारे आणि डॉ. खोडवे यांनी लातुर येथे -हदयरोगावर उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या अत्याधुनिक ग्लोबल हार्ट केअर सेंटर च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभागप्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, लातुर येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. संजय शिवपुजे, अंबाजोगाई येथील -हदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे, आय. एम. ए. लातुर चे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे व इतर मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री डॉ. एस. सी. मनचंदा हे जगविख्यात कॉर्डिऑलॉजिस्ट असून नवी दिल्ली येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयात कॉर्डिऑलॉजि विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे.


शासकीय सेवानिवृत्ती नंतर डॉ. मनचंदा हे गेली अनेक वर्षांपासून योगाभ्यास आणि -हदयविकार यावर संशोधन करीत असून या विषयासंबंधी त्यांनी अनेक संशोधन प्रबंध लिहीले आहेत. ग्लोबल हार्ट केअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. दिपक कटारे हे एम्स मधील कॉर्डिऑलॉजि विषयातील त्यांचे विद्यार्थी आहेत.
आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. मनचंदा यांनी योग आणि-हदयविकार या संबंधीची आपल्या संशोधन प्रबंधात लिहिलेली माहिती दिली. योग आणि -हदयविकार यांची शास्त्रीय सांगड घालत अत्यंत सोप्या शब्दात नियमित योग करण्यामुळे -हदयरोगाला कसे दुर ठेवता येवू शकते. यावेळी नेमके कोणते योग प्रकार -हदयविकाराला कसे दुर ठेवू शकतात याची शास्त्रीय पद्धतीने माहिती सांगितली.


आपल्या भाषणात पद्मश्री डॉ. मनचंदा यांनी लातुर शहरात कॉर्डिऑलॉजि विभागातील तज्ञ डॉ. दिपक कटारे आणि डॉ. खोडके या दोन तरुणांनी सर्व अत्यावश्यक सुविधा असलेले हे ग्लोबल हार्ट केअर हॉस्पिटल सुरु केल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमात स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, लातुर येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. संजय शिवपुजे, अंबाजोगाई येथील -हदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे, लातुर येथील डॉ. उमेश कानडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. दिपक कटारे यांनी कॉर्डिऑलॉजि विभागातील पदव्युत्तर शिक्षण डॉ. मनचंदा सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाल्याबद्दल स्वतः ला नशिबवान असल्याचे सांगत रुग्णांवर उपचार करतांना घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. मनचंदा सर यांनी दिलेला गुरु मंत्र आणि प्रत्येक रुग्णातील बदलत्या स्थितीमुळे नवनवीन गोष्टी शिकण्याचा मिळणारा आपली रुग्ण सेवा परिपुर्ण करण्यास अत्यंत मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास ८५ वर्षीय आमचे गुरु पद्मश्री डॉ. एस. सी. मनचंदा यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायक सुभाष शेप यांनी केले.