डॉ. सुधीर देशमुख यांची नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदी नियुक्ती


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सक विभागाचे प्राध्यापक तथा सोलापूर येथील वंशमपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची नियुक्ती नांदेड येथील पद्मश्री डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता म्हणून झाली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने शासन आदेश क्र.
बदली-२०२३/प्र.क्र.३१८/२०२३/वैसेवा-१, दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी निगर्मित करण्यात आले आहेत.
सदरील शासन आदेशात पुढे असे म्हटले आहे की, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्स कार्यगार डॉ. एस. आर. वाकोडे, प्राध्यापक, स्त्री रोग व प्रसुतीशाख, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड यांच्याकडे शासन आदेश दि. २२.०५.२०२३ अन्वये सोपविण्यात आला होता.
आत्ता या आदेशान्वये प्रशासकीय कारणास्तव डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नादेड येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुधिर देशमुख, प्राध्यापक, शल्यचिकित्सा शाखा, स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे. तसेच डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार संपुष्ठात आणण्यात येत आहे.
डॉ. सुधिर देशमुख, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्र, स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा.
असे या आदेशात म्हटले आहे.
सदरील शासन आदेशावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शिवाजी पाटणकर, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी आहे.