महाराष्ट्र
डॉ. नितीन चाटे यांची स्वारातीवैम च्या सर्जरी विभागाचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती


सर्जरी विभागाचे राज्यातील सर्वात युवा प्राध्यापक होण्याचा मान
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालययेथील सर्जरी विभागाचे डॉ. नितीन चाटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील गेली आठ वर्षांपासून सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत महात्मा जोतिबा फुले योजनेच्या भरीव कामातून राज्यभर आपली ओळख निर्माण केलेल्या डॉ.नितीन चाटे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राध्यापक पदी निवड करण्यात आली असून पदस्थापना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे.


पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून अंबाजोगाई येथे आलेल्या डॉ नितीन चाटे यांनी विद्यार्थी चळवळीत योगदान देत मार्ड संघटनेचे राज्य सचिव म्हणून काम केलेले आहे.
विभागप्रमुख म्हणून गत आठ वर्षे कार्यरत असताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये चाळीस वर्षानंतर वाढ करण्यात आली,
बीड जिल्ह्यातील पहिली ओपन हार्ट सर्जरी करून स्वाराती रुग्णालयाची मान उंचावली आहे.स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये,
महात्मा फुले योजनेचे राज्य स्तरीय अभियान राबवून गेली सहा वर्षापासून अविरत काम करून प्रथम क्रमांकावर येण्याचा मान त्यांनी मिळवून दिला आहे या योजनेमधून आजपर्यंत हजारो रुग्णांना फायदा झालेला आहे.


स्वाराती रुग्णालयामध्ये सर्जरी विभागाअंतर्गत मॉस्कीटो नेट मेश या अत्यल्प दरातील हर्निया सर्जरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आलेली आहे.त्याच कालावधीमध्ये स्वाराती रुग्णालयात थायरॉईड सर्जरीची अभिनव अभियान राबून कमी टाक्यांची मिनी-इंसिजन थायरॉईड शस्त्रक्रिया करणारे राज्यातील पहिले व एकमेव केंद्र बनवले आहे.सर्जरी विभागातील सहयोगी प्राध्यापक म्हणून आजपर्यंत त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा रुग्णांना खूप मोठा फायदा झालेला आहे यामुळे परिसरातील जनतेचे आशीर्वाद व रुग्णांनी दिलेली प्रेमाची थाप हीच आपली शिदोरी समजून सेवेचे कार्य अविरतपणे चालू ठेवले याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादन करून सर्जरी विभागातील प्राध्यापक म्हणून आज डॉ. नितीन चाटे सर यांना पदस्थापना करण्यात आली आहे.त्यांच्या निवड प्रसंगी जनतेतील व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

