महाराष्ट्र
ज्यांच्या नेत्यांनीच लग्न झालेली नाहीत ते काय तुमची लग्न लावून देणार!


आ. धनंजय मुंडे यांचा पलटवार
ज्यांच्या नेत्यांनीच लग्न झालेली नाहीत ते काय तुमची लग्न लावून देणार असा पलटवार आ. धनंजय मुंडे यांनी राठी येथील प्रचारसभेत बोलताना केला.
परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुन द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी लग्नाच्या मुद्दाचा फंडा वापरला होता. मतदार संघातील तरुण अविवाहित मुलांनी आपल्याला निवडून द्यावे, आपण त्यांची लग्ने करुन देतो असे ते म्हणाले होते.
आपले प्रतिस्पर्धी राजेसाहेब देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यावर ना. धनंजय मुंडे यांनी पलटवार करतांना ज्यांच्या नेत्यांनीच लग्न झालेली नाहीत ते काय तुमची लग्न लावून देणार असे म्हटले आहे.
आपल्या विस्तारीत भाषणात ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मी आजपर्यंतच्या राजकारणात कधीही जातीपातीचे, गटातटाचे राजकारण केले नाही. निवडणुकी पुरतेच मी राजकारण करतो. एकदा निवडणूक संपली की माझ्याकडे येणा-या प्रत्येक माणसाचं काम प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

