जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचारी आंदोलनात फुट; २लाख कर्मचारी बाहेर


एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणून तीव्र आंदोलन पुकारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोनलनात आता फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारण्यात आले.मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे सगळी व्यवस्था कोलमडलेली होती. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र आता संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पडल्याने संपाची ही धार कायम राहणार की, बोथट होणार असा सवाल आता केला जात आहे.
दोन संघटना संपातुन निघाल्या बाहेर
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी झालेले असतानाच प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने संपातून माघार घेतल्यामुळे उभा आंदोलनात फूट पडल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने आपण या संपातून माघार घेत असल्याचे सांगत आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
शासनाच्या अडचणी समजावून घेण्याचा मांडली भुमिका
राजपत्रित कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार गणपत कुलथे यांनी सांगितली की, शासनाकडून कर्मचाऱ्यांना फायदा होत असतो.त्याचबरोबर शासनाच्याही काही अडचणी असतील तर त्या कर्मचाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. मात्र आमच्या मागण्यांसाठी आणि पुढील ध्येय धोरणे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची संपातून माघार घेतली जात असून या संपातून अडीच लाख कर्मचारी माघार घेतली असल्याचेही संभाजी थोरात यांनी सांगितले.
२.५ लाख कर्मचारी निघाले संपातुन बाहेर
अडीच लाख कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता संपामध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे. या संपातून कर्मचाऱ्यांनी माघार घेत आपण सरकारला समजून घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने सरकारला आपण समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत. पुढील निर्णयासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.