जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार सुरु करण्यात यावेत; आ. मुंदडा


बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरु करण्यात यावेत अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ चव्हाण यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,
आदरणीय महोदय,बीड जिल्ह्यात गोवर्गीय व म्हैसवर्गीय पशूनां लंम्पी’ या त्वचेच्या संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव झाल्याने जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार जवळपास मागील सहा महिन्यापासून बंद आहे. सध्या सदर आजाराचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे आठवडी बाजार सुरुकरणेबाबत मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे.
जनावरांचे आठवडी बाजार हे ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक कणा आहे. परंतु बाजार बंद असल्यामुळे छोटे मोटे व्यवसाय करणारे भाजीपाला, अन्न धान्य, शेतीसाठी व कौटुंबिक गरजासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात विकणारे व्यवसाईक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आठवडी बाजारातील व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे जनावरांची खरेदी विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांना पशुधन खरेदी विक्री साठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तरी लंम्पी आजाराचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक कणा असलेले आठवडी बाजार त्वरित सुरु करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात आ. नमिता मुंदडा यांनी या निवेदनात केली आहे.