घरफोडी प्रकरणातील २ आरोपींना कोठडी; पोलिसांची दबंग कामगिरी


अंबाजोगाई शहरातील सिल्व्हर सिटी वसाहतीतील घर भर दिवसा करुन साडेतीन लाख रुपयांवर डल्ला मारणा-या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांच्या या दबंग कारवाई चे स्वागत करण्यात येत आहे.
या बाबतचा अधिक तपशील असा की, दिनांक 25/07/2023 रोजी फिर्यादी सतीश सुर्यकात दहातोंडे वय 49 वर्षे रा. सिल्वर सिटी कॉलनी अंबाजोगाई यांचे राहते घरी दुपारी 03:00 ते 03:30 वा. दरम्यान अज्ञात दोन चोरटयानी घराचा दरवाज्याचा कुलूप कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले 3,50,000/- रु. चोरुन नेले बाबत दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे अंबाजोगाई शहर येथे गुन्हा 286/2023 कलम 380,454,34 भा.द.वि अन्वये नोंद झालेला आहे.
गुन्हा घडताचा तपासाची चक्रे वेगवान फिरवत गोपनिय माहीती काढुन अवघ्या 24 तासाचे आत गुन्हा उघडकीस आनुन गुन्हयातील आरोपी नामे राहुल प्रल्हाद बनसोडे रा. मुंकुंदराज कॉलनी अंबाजोगाई यांच्या मुस्क्या बांधुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे राहते घरातुन गुन्हयातील चोरी गेलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली असून गुन्हयातील ईतर आरोपी अजहर अब्दुल रहेमान पाठाण रा. पेन्शनपुरा अंबाजोगाई व त्याचे साथीदार यांचा शोध घेवून उर्वरीत रक्कम जप्त करण्याबाबत तपास चालु आहे. यातील आरोपीतांकडून आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. श्री. नंदकुमार ठाकुर, पोलिस अधिक्षक बीड, श्रीमती कविता नेहरकर पवार, अपर पोलिस अधिक्षक, अंबाजोगाई, मा. श्री. अनिल चोरमेल, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विनोद घोळवे, प्रभारी अधिकारी पोलिस स्टेशन अंबाजोगाई शहर यांचे नेतृत्वात पो.उप.नि. चाँद मेंढके, म. स. फौ / 1143 वाघमारे पोह 973 घोळवे, पोह/1485 वडकर, पो.अ. 509 लाड, पो. अं. 2020 नागरगोजे, पो. अं. 170 काळे, पो. अं.890 चादर, पोस्टे अंबाजोगाई शहर व स्था. गु.शा बीड येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली.