कुलगुरू डॉ. उध्दव भोसले व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना जलप्रहरी पुरस्कार जाहीर


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले व नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भारत सरकारच्या जलमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा जलप्रहरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व सरकारटेल डॉट कॉम तर्फ प्रतिवर्षी जलसिंचन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा गौरव जलप्रहरी पुरस्कार देऊन करण्यात येतो. यावर्षी देण्यात येणारा जलप्रहरी पुरस्कार यावर्षी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले व नांदेड येथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना घोषित करण्यात आला आहे.


हा पुरस्कार 29 मार्च 2023 रोजी दिल्ली येथील न्यु महाराष्ट्र सदन हॉल येथे केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मानी, पाणी, जैवविविधता संवर्धन व जवन करण्यासाठी पाणलोट विकास व्यवस्थापनासाठी मातीची कामे करून पावसाच्या पाण्याची साठवण तसेच वाहून जाणारे पावसाची पाणी झिरपण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणलोट विकासाची कामे केली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन डॉ. उध्दव भोसले यांना तर


जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांनाच अभिजित राऊत यांनी गोदावरी व नांदेड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या इतर नद्यांची नदीचे पात्र स्वच्छ ठेवून विस्तारीत करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर केले असल्यामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती सरकारीटेल डॉट कॉम चे अमेय साठ्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबध्दल सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्दालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व पुण्याचे उद्दोजक रसिक कुंकूलोळ यांनी कुलगुरू डॉ. उध्दव भोसले व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अभिनंदन केले.
या संदर्भात कुलगुरू डॉ .उध्दव भोसले व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत पत्रावर जलप्रहरी चे संयोजक अनिल सिंह, कार्यकारी संचालक सरकारी टेल डॉट कॉम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.