किशोर वय म्हणजे भावनिक, शारिरीक व मानसिक स्थित्यंतरातुन स्थैर्याकडे जाण्याचा प्रवास ; डॉ. अनघा पाठक


विद्यार्थी जीवनातील प्रत्येक टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातही सर्वात महत्वाचा काळ आहे तो म्हणजे ‘किशोरवय’ कारण या काळातच आपल्या शरीरात नैसर्गिक बदल होतात त्यांचा स्वाभाविक परिणाम हा मन व मेंदुवर होतोच हे लक्षात घेऊन विचार केला तर किशोरवय म्हणजे शारीरिक, मानसिक व भावनिक स्थित्यंतरातून स्थैर्याकडे जाणारा प्रवास असून जो हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करतो तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ.अनघा पाठक यांनी केले.
येथील श्रीखोलेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थीनींच्या समवेत ‘विशाखा महिला दक्षता समिती व कळी उमलताना ‘ या समुपदेशनपर कार्यक्रमात अध्यक्षा म्हणून शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ.अनघा पाठक बोलत होत्या.पुढे त्यांनी मुलींना आरोग्याबरोबरच आहारातील पोषक षड् रस कोणते व कोणत्या पदार्थांचे सेवन कशा पद्धतीने करावे.त्याचा आपल्या शरीर व मनावर कसा परिणाम होतो.यातूनच एक सशक्त, सुदृढ,सक्षम असा समाज निर्माण होईल याबद्दल अतिशय समर्पक, प्रेरक असे मार्गदर्शन केले.


तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय नभा वालवडकर यांनी महिला व मुलींनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम असले पाहिजे त्यासाठी किशोरवयापासूनच आपल्या जीवनाचे एक ध्येय ठरवून तिने कार्यरत राहिलं पाहिजे . तसेच मुलींनी सद्सद्विवेक बुद्धीने कोणताही निर्णय घ्यावा,सोशल मिडियाच्या जाळ्यात आपण अडकणे किंवा विविध ॲपचा अयोग्य वापर न करणे उलट त्याचा चांगला तो उपयोग करणे तसेच भारतीय संस्कृतीनुसार जे सण साजरे केले जातात,ज्या रूढी परंपरा जतन केल्या जातात त्यामागील वैचारिक भाव, वैज्ञानिक भाव समजून घेऊन त्याचे जतन व संवर्धन कराणे.चांगल्या विचारांच्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहणे.कोणतीही गोष्ट आई-वडिलांनापासून लपवून न ठेवता त्या स्पष्टपणे सांगाव्यात असे सांगितले.


तसेच यावेळी दुसऱ्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी आयोजित समुपदेशनात शैलेंद्र कंगळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करून देतांना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची महती सांगितली. मोरेश्वर देशपांडे यांनी किशोरवयातील आहार व आरोग्य या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. तर शालेय शिस्त या विषयी मिलिंद जोशी यांनी समुपदेशन केले.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जयश्री ईटकुरकर यांनी राष्ट्र निर्मितीचे एक अंग म्हणजे महिला व ती सक्रिय असलीच पाहिजे हे सांगताना राष्ट्रसेविका समितीचा परिचय मुलींना करून करून दिला. मातृत्व ,कर्तृत्व व नेतृत्व निर्माण करण्यासाठी किशोरवयीन अवस्था संस्कार ग्रहण करणारे व संस्कारांची गरज असणारे वय असून आपले जीवन आदर्शवत कसे असावे हे सांगितले.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे,शालेय समिती सदस्या नभा वालवडकर, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे,पर्यवेक्षक अरूण पत्की,विभाग प्रमुख प्रशांत पिंपळे,दक्षता समिती विद्यार्थीनी प्रतिनिधी प्रियंका देशपांडे तसेच सर्व शिक्षक बंधु -भगीनी , कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन मनोज कराड,रामकंवर सांगळे,सपना डुकरे,स्वागत व परिचय वर्षा मुंडे,तर उपस्थितांचे आभार सुरेखा काळे यांनी मानले.