ऍमेझॉन च्या जाहिरातीत चमकला अंबाजोगाईचा आदित्य रापतवार!


ऑनलाईन शॉपिंग मध्ये संपुर्ण जगामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या ऍमेझॉन या कंपनीच्या वतीने विक्री साठी बाजारात आलेल्या लहान मुलांच्या कपड्यांच्या जाहिराती साठी अंबाजोगाई येथील चिमुरडा आदित्य तेजस रापतवार याची ऍमेझॉन कंपनीने अधिकृतपणे निवड केली आहे. सदरील निवडीची अधिकृत माहिती ऍमेझॉन कंपनीच्या वतीने आदित्य याच्या आई-लडिलांना ऍमेझॉन कंपनीने अधिकृतपणे मेलव्दारे केली आहे.


ऑनलाईन शॉपिंग मध्ये ऍमेझॉन कंपनीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करुन आज पहिल्या नंबरचा क्रमांक मिळवला आहे. या ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडे देशातील वेगवेगळी उत्पादने करणा-या कंपन्या आपला मालक विक्रीसिठी ऍमेझॉन कंपनीकडे पाठवतात. ही ऍमेझॉन कंपनी या उत्पादनांनी पाठवलेल्या उत्पादनांची जाहिरात करुन ते ग्राहकांना ऑनलाईन खरेदीसाठी मार्केट उपलब्ध करून देते.


अशाच एका उत्पादक कंपनीने लहान मुलांसाठी बनवलेले शर्ट-पॅण्ट हे ऍमेझॉन कंपनी कडे पाठवले आणि या कपड्यांची जाहिरात बनवणा-या RAS Media या Advertising and Casting कंपनीने या जाहिराती साठी आदित्य रापतवार याची निवड केली. RAS Media ही कंपनी जाहिराती, शॉर्ट फिल्म, सिरीयल्स आणि वेब सिरीज बनवणा-या कंपनीपैकी एक अग्रगण्य कंपनी असून या जाहिराती नंतर दुसऱ्या एका जाहिरातीसाठी सुध्दा आदित्य चे कास्टींग पुर्ण झाले असून येत्या २६ जानेवारी रोजी ही त्यावरची अंतीम प्रक्रिया पुर्ण होणार आहे.


ऍमेझॉन कंपनीकडे अशाच एका कंपनीने लहान मुलांचे शर्ट-पॅण्ट डिझाईन करुन विक्रीसाठी पाठवले होते. सदरील ड्रेसची जाहिरात करण्यासाठी ऍमेझॉन कंपनीशी टायप असलेल्याRAS Media and Entertainment Pvt.Ltd Company ने आदित्य रापतवार या चिमुकल्याच्या ड्रेस चे शूट फायनल करुन website वर अपलोड केले आहे. सदरील जाहिरात ऍमेझॉन ने आपल्या अधिकृत पेज वर टाकली असून यासंदर्भाचा मेल आदित्य याच्या आई-वडिलांना पाठवला आहे.


आदित्य रापतवार हा अंबाजोगाई येथील रहिवासी तेजस राजेंद्र रापतवार यांचा मुलगा असुन मागील अनेक वर्षांपासून तो मुंबई येथे आपल्या आई-वडिला़सोबत रहातो. आदित्य चे वडिल तेजस रापतवार हे मुंबई येथील नामा़कित हॉस्पिटलमध्ये कॉर्डिऑलॉजिस्ट टेक्निशियन असून आई सौ. प्रियंका या गृहिणी आहेत. आदित्य खारघर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेत आहे. आदित्य हा आता ऍमेझॉन च्या जाहिरातीत चमकला असल्यामुळे तो जगभरात ऑनलाईन विक्री करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीच्या जाहिरातीत संधी मिळालेला अंबाजोगाई शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एकमेव चिमुकला ठरला आहे.


आकाशाला गवसणी घालणारे हे यश आदित्य ला अगदी कमी वयात मिळाल्याबद्दल आदित्य याचे , त्यांचे वडील येस व आई सौ. प्रियंका यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. आदित्य हा अंबाजोगाई आगारातील सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक (एकाऊंटंट) आणि आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र रापतवार यांचा नातु आहे.