महाराष्ट्र
आ. धनंजय मुंडे यांनी केले अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!


विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून १ लाख ४० हजार इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार व्यक्त केले.

