आगामी काळात संपुर्ण जगाला पाणी संकटाचा प्रश्न भेडसावणार; मोदी


दक्षीण आशियाई स्थानिक स्वराज्य पदाधिकारी परीषदेत राजकिशोर मोदी यांचे वक्तव्य
जल हे जीवन आहे, यासाठी निसर्ग व मानवी जीवन यात योग्य सुसूत्रता असावी असे परखड मत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केले तसेच आगामी काळात संपूर्ण जगाला पाणी व पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागेल यासाठी त्याबाबत चे नियोजन आत्तापासूनच अतिशय नियोजनबद्ध व अद्ययावतपणे करण्याची गरज असल्याचे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली .
नवी दिल्ली येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई च्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील दक्षिण आशियाई देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या परिषदेत अध्यक्ष म्हणून बोलत होते . या प्रसंगी उदघाटक म्हणून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासह माजी महापौर विजया रहाटकर, अशोककुमार बांझो (अध्यक्ष ASPAC)व महापौर धुलीखेल नेपाळ, इंडोनेशिया येथील श्रीमती बरनोडा इरावती (सचिव ASPAC) ,हंसाबेन पटेलयांच्यासह अनेक देशातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.


अख्या जगातील महापौर आणि नगर पालिकांच्या पदाधिकारी यांच्या समोर पिण्याच्या पाण्याचे नियोजन या एकाच गोष्टीवर केंद्रीत असल्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदेत ऐकावयास व पहावयास मिळाला. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने दिल्लीत दक्षिण आशियाई देशांतील महानगर पालिका आणि नगर पालिकांच्या प्रमुखांची परिषद आयोजित केली होती. यात युरोपियन युनियन, बांग्लादेश, भुटान, नेपाळ, इंडोनेशिया आणि भारत व श्रीलंका या देशांतील महापौर, नगर पालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
निसर्ग व मानवी जीवन यात योग्य ती सुसुत्रता असावी; केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत


या परिषदेचे उदघाटक म्हणून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यावेळी उपस्थित होते. जल हे जीवन आहे यासाठी निसर्ग व मानवी जीवन यात सुसूत्रता असावी असे मत त्यांनी यावेळी मांडले. आपल्या भाषणात भारत देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्य हे दखलपात्र असल्याचे सांगितले . अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई ही संस्था मागिल अनेक वर्षांपासून केवळ महाराष्ट्रासाठी चा नव्हे तर देशपातळीवर अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे देखील आवर्जून उल्लेखित केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न; राजकिशोर मोदी


आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष मा. रणजित चव्हाण साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट रित्या काम करत आहे . तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मागील 97 वर्षांपासून महानगर पालिका आणि नगर पालिकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रशिक्षण देवून लोकशाही बळकट करण्याचे काम करीत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, संस्थेचे नियम व कायदे समजावून सांगणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, वर्तमान काळातील समस्या, नगरसेवकांचे अधिकार व कर्तव्य, विकासाचा आराखडा कसा तयार करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट व प्रक्रिया आणि अद्यावत माहिती व तंत्रज्ञान आदी गोष्टींची माहिती नगरसेवकांना दिली जाते. संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण हे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे येवू शकले नसल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारची जागतिक पातळीवर परिषद ही दर दोन ते तीन वर्षांनी जागतिक स्तरावर आयोतीत केली जात असल्याचे सांगून यापूर्वी अशी बैठक गोवा या ठिकाणी संपन्न झाल्याचे राजकिशोर मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेखित केले.
वाढते शहरीकरण व वातावरण बदलाच्या परीणामावर परीषदेत चर्चा!
या परिषदेमध्ये वाढते शहरीकरण व वातावरणातील बदल , नैसर्गिक ऊजेची स्रोत निर्माण करणे, पर्यावरणाचा समतोल, जलस्त्रोत व त्याच्या नियोजनबद्ध वापर,प्राचीन संस्कृती व पुरातन वास्तू जतन , शहरीकरणाच्या समस्या या व अशा विविध विषयांवर उपस्थित मान्यवर तथा अधिकाऱ्यांनी सखोल असे विचारमंथन केले .


भुतान, रशिया, कोलंबो, सिंगापुर, नार्वे, फिलीपाइन्स व इतर प्रतिनिधींचा सहभाग
या परिषदेत बांग्लादेश महानगर पालिकेचे अध्यक्ष देवान कमल अहमद, भुटानच्या थिंपू महानगर पालिकेचे महापौर उगेन दोरजी, कोलंबो महानगर पालिकेचे महापौर रोझी सेनानायके, बेल्जियमचे पियेरो रेमिती, ग्रीसचे पॅनॉजिओटिस कारामानोस, कोरियाचे जैमी पॉलो मोरा,नेपाळचे अशोककुमार बायांजू, नॉर्वेचे गिलबर्ट सॅमे, फिलिपिन्सचे मॅडेलीन आर्लेन गुजमान, रशियाचे रसिख सागितोव, सिंगापूरचे ताइसुके सकुराई आणि दक्षिण आफ्रिकेचे भेके स्तोफिले यांच्यासह जवळपास 250 राष्ट्रीय—आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी याजागतिक परिषदेमध्ये सामील झाले होते.
समस्या व माहिती तंत्रज्ञान देवाणघेवाण वर चर्चा
दक्षिण आशियाई देशासह जगातील स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील समस्या आणि माहिती व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण हा या सेमिनारचा मुख्य विषय होता. पिण्याचे पानी, पाण्याचे रिसायकलिंग, वेस्ट मॅनेजमेंट यासारख्या समस्या जगाला सर्वाधिक तीव्रतेने भेडसावत असल्याचे संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक यांनी यावेळी सांगितले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इनोवेशन आन रेसिलेंस बिल्डिंग, कंझर्वेशन चॅलेंजेस फॉर बायोडायवरसिटी इन इंडियन सिटीज, यू—20, वाय—20 आणि टी—20 ची माहिती, क्लायमेट रेसिलिंट सिटीज अँड अक्शन ऑन क्लायमेट चेंज आणि लोकर अक्शन अँड ग्लोबल कोलाकोरेशन आदी विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ही परिषद महासंचालक, तथा माजी आयएएस अधिकारी जयराज फाटक, संस्थेचे उपमहासंचालक व दिल्ली विभागाचे प्रमुख रवीरंजन गुरू यांच्या कुशल मार्गदर्शन व नेतृत्वाखाली संपन्न झाली . या परिषदेमध्ये 20 देश, 50 वक्ते , शंभराहून अधिक महापौर, तीनशेहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग आढळून आला.