अखेर “विक्रम” हरपला!


प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (77) यांचे आज शनिवारी दुपारी 2:30 चे सुमारास दु:खद निधन झाले.
खरे तर विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी बुधवारी रात्री उशिरा आली होती. यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव सुरु झाला होता.
गेली वीस दिवसांपासून मधुमेह आणि इतर आजारामुळे उपचार घेत असलेले विक्रम गोखले कोमामध्ये गेले होते. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असतांनाच आज शनिवारी दुपारी 2:30 चे दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या मृत्युची अधिकृत माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णालयाने दिली असल्यामुळे या सर्व चर्चांना आता विराम मिळाला आहे.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. ते अत्यंत चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला आहे. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
सध्या त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारली होती. काही वर्षांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अग्निहोत्र’ मालीकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भुमिका चांगलीच गाजली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ती भुमिका घर करुन आहे. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. विक्रम गोखले यांनी 2010 मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं. त्यानंतर 2013 मध्ये त्यांना ‘अनुमती’ या चित्रपटातील भुमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं.
विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भुमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भुमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शुटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शुटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करायचे. विक्रम गोखले यांना 2013 मध्ये ‘अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) मिळाला होता. त्याबरोबरच त्यांना 2015 मध्ये ‘विष्णुदास भावे जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच 2017 मध्ये ‘हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार’, 2018 मध्ये ‘पुलोत्सव सन्मानाने ‘ गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव’ पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.
विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भुमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखले यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
हिंदी चित्रपटात ही उमटवला ठसा!
मराठी रंगभूमी, चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखले यांनी आपल्या चतुरस्र अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विक्रम गोखले यांनी 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत अभिनीत अग्निपथ, तसेच सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 1999 मधील “हम दिल दे चुके सनम” चित्रपटासह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं-
काम आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
विक्रम गोखले यांच्या निधनामुळे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतीने एक सशक्त अभिनेता गमावला आहे. विक्रम गोखले यांना माध्यम न्युज नेटवर्कच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.
💐💐