“अक्षय” शुभेच्छा…!


अक्षय वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा… !
आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली, आपल्यासमोर मोठी झालेली मुलं त्या़च्या आयुष्यात समर्थ, कर्तृत्ववान, समंजस आणि कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करीत त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली की आपल्याला निश्चितच आनंद मिळतो. अक्षय नंदकिशोर मुंदडा हा त्या मुलांपैकीच एक!
नंदकिशोर मुंदडा हे माझे शालेय जीवनापासुनचे मित्र आहेत. नंदकिशोर मुंदडा यांचा डॉ. विमल मुंदडा यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर त्या राजकारणात येण्यापूर्वीपासूनच त्यांचा ही स्नेह लाभल्यामुळे अक्षय ला मी अगदी लहानपणापासून ओळखतो. त्याचा जन्म, त्याचे बालपण, शालेय महाविद्यालयीन शिक्षण, त्याचे लग्न आणि एक त्याला झालेली अपत्य! या काळात घडलेल्या सर्व घटनांचा मी एक डोळस साक्षीदार आहे.


अक्षय चा स्वभाव हा सुरुवाती पासुनच शांत, प्रत्येक गोष्ट समजून घेवून पुन्हा रिअँक्ट होणारा आहे. नंदकिशोर मुंदडा हे पुर्वीपासुनच राजकारणात सक्रीय असल्यामुळे आणि डॉ. सौ. विमलताईं मुंदडा या राजकारणात आमदार, राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यरत असल्यामुळे अक्षय याचा संबंध शालेय शिक्षण चालु असतांनाच राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांशी आला.
आ. डॉ. सौ. विमलताईं मुंदडा यांनी आपल्या हजारो समर्थकांसह मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, तेंव्हा पासून अक्षय ने पवार साहेबांसोबतचे आपले वैयक्तिक संबंध आजपर्यंत तरी कारण चांगलेच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे !


अक्षय च्या वैयक्तिक, राजकिय जीवनातील अनेक चढ-उतार, यश-अपयश आलेले मी जवळून पाहीले आहेत. पण आलेल्या प्रत्येक संकटावर अनेकदा कोणीही सोबत नसतांना ज्या धैर्याने आणि हिंमतीने मुकाबला करुन त्या संकटांना तोंड देवून त्यावर त्याने केलेली मात अतुलनीय आहे!


ना. डॉ. सौ. विमलताईंचं जाणं हा आघात सहन न करण्या पलिकडचा असला तरी या आघातातुन बाहेर पडुन वडील नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली अक्षय ने पुन्हा राजकीय उभारी मिळवण ही सहज सोपी गोष्टी नव्हती, पण ही लिलिया अक्षय आणि आ. सौ. नमिता मुंदडा यांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शना खाली पार केली आहे. आता तो भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आपली राजकीय ओळख अधिक ठळक करु पहात आहे.या सर्व प्रयत्नांत त्याची अर्धांगिनी आ. सौ. नमिता यांची उत्कृष्ट साथ आणि राजकीय परफॉर्मन्स आहे.


आजपर्यंत आलेल्या संकटांचा मुकाबला करीत अक्षय युवा पिढीतील एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून आपल्या समोर उभा आहे. डॉ. सौ. विमलताईं मुंदडा मंत्री असतांना मंत्रालयातील मिळालेले कामकाजाचे धडे आपली अर्धांगिनी आ. सौ. नमिता यांना स्वतः आणि आपले वडील नंदकिशोर मुंदडा यांना सोबत घेवून उत्कृष्टपणे समजावून सांगत आहे. एक आदर्श राजकारणी, एक आदर्श मुलगा, एक आदर्श पती आणि आता एक आदर्श पिता अशा भुमिका तो सध्या अत्यंत चांगल्या पध्दतीने निभावत आहे. अक्षय सारखा कर्तृत्ववान मुलगा लाभलेल्या बापाला आणखी यापेक्षा अधिकचे समाधान ते काय हवे असते!


अक्षय तुझ्या आयुष्यात आलेले कौटुंबिक सुख, राजकीय कर्तबगारी यापुढे सदैव अधिक वृध्दींगत होत जावो. तुला, तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुदृढ आयुष्य लाभो.
ना. डॉ. सौ. विलमताई मुंदडा यांच्या पेक्षाही आ. सौ. नमिता यांची राजकीय कमान वाढो.
वाढदिवसा निमित्त तुला
मनपुर्वक शुभेच्छा..!
🌹 सुदर्शन रापतवार,. “माध्यम” समुह, अंबाजोगाई.