अंबाजोगाई येथील निबंधक वर्ग २ कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २ कोटी ५३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाने शासन निर्णय क्रं. आस्थाप-२०२२/ ६७१/प्र.क्र.१९९/म-१, दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ निगर्मित केला असून नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक औरंगाबाद यांचे अधिनस्थ सह दुय्यम निबंधक वर्ग २ अंबाजोगाई या कार्यालयाच्या नवीन इमारतीस २कोटी ५३ लक्ष ४५ हजार४२८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. सदर कार्यालयाच्या बांधकामासाठी येणारा खर्च २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील मागणी क्रं. एच-८, – ४०५९ सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च, नोंदणी व मुद्रांक विभाग इमारतीचे ४०५९ २४९७ या लेखाशिर्षाखाली उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय अनुदानामधुन भागविण्यात येणार आहे. सदर कामाची सुरुवात २०२३-२४ या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. या आदेशावर शासनाच्या महसूल व वन विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची सुभाष पालव यांची स्वाक्षरी आहे.
▪️आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा
अंबाजोगाई येथील निबंधक कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी या विभागाच्या लोकप्रतिनिधी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी महसुली व वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आ. नमिता मुंदडा यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.