महाराष्ट्र
अंबाजोगाईत वादळीवाऱ्यासह झापुकझुपूक गोलीगत पावूस! मगरवाडीत वीज पडून एक ठार


वीज पडून एक ठार;
आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अंबाजोगाई शहर आणि परिसरात आज सायंकाळी पाच वाजता झापुकझुपूक गोलीगत पावूस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक विभागातील रस्त्यावर पाणी तुंबून नागरीकांचे हाल झाले तर आंबा व भाजीपाला पीकांचे मोठे नुकसान झाले.
अंबाजोगाई शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी पाच च्या सुमारास वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटासह गारांच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली.


सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. पावसाचा पहिला तडाखा जोरदार होवू लागताच अचानक पावसाची व वा-याची तीव्रता वाढली आणि गारांचा जोरदार पाऊसाने शहर व परीसर झोडपून काढला.
हवामान विभागाने मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सोमवारी दुपारपासून वातावरणात अचानकच बदल होण्यास सुरुवात झाली आणि आणि सायंकाळी पाचच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाने आपली हजेरी लावली.अचानक आलेला वादळीवारा आणि गारांच्या पावसामुळे नागरीकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.


अचानक झालेल्या या वादळी पावसामुळे गेली अनेक दिवसांपासून जाणवणारे तीव्र उन व जीवघेणी गर्मी
तुन नागरीकांना थोडासा सुटणारा मिळाला. तर अंबा व भाजीपाला पीकांचे मोठे नुकसान झाले. शहरातील विविध भागात नाले व रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे अनेक विभागातील रस्त्यावर पाणी तुंबले तर वादळी वारा, गारपीट व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
अंबाजोगाई शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावातही गारांच्या पावसाने हजेरी लावल्याचे व मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

