१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन सामुहिक उपवासात पत्रकारांच्या संघटनांसह विविध संघटना घेणार सहभाग


देशभरातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने यावर्षी पासुन सुरु करण्यात येणा-या सामुहिक उपवासाचे शहरातील पत्रकार संघटनांसह विविध संघटनांचा सहभाग राहणार आहे अशी माहिती संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.
देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्यांसाठी जाचक ठरणारे तीन कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली गेली सात वर्षांपासून अंबाजोगाई येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.


यावर्षापासून १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्या या विषयावर १९ मार्च रोजी नगर परिषदेच्या आद्द कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोरील चिंचेच्या झाडाखाली सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत किसान पुत्र अनिकेत डिघोळकर यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक उपवास करण्यात येणार असून या सामुहिक उपवासातमराठी पत्रकार परीक्षेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, तालुकाध्यक्ष गजानन मुंडेगावकर, अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित गाठाळ, अविनाश मुंडेगावकर, प्रशांत बर्दापूरकर, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे दादासाहेब कसबे, परमेश्वर गीत्ते, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप आरसूळ, सतीष केंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या पत्रकार संघाचे सभासद तसेच शहरातील इतर संघटनांचे प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
सदरील सामुहिक उपवासाचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार असून यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सुरुवात होणार आहे. सदरील व्याख्यान संपताच सामुहिक उपवास सोडण्याचा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.


१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यासर्व कार्यक्रमाची आसन व्यवस्था, सिनियर सिटीझन यांना खुर्चीवर बसुन व्याख्यान स्पष्ट ऐकु येईल अशी ध्वनी व्यवस्था, उपवासाची सांगता करण्यासाठी एक प्लेट खिचडी, २००ग्रॅम पाणी बॉटल, एक कप चहा ही व्यवस्था लंगोटीयार या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. या ग्रुपचे सदस्य डॉ. सुरेश आरसुडे, सुदर्शन रापतवार, सुभाष बाहेती, चंद्रशेखर वडमारे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, शेख जमील भाई, प्रा. प़डीत कराड, शिवाजी कुलकर्णी, रमेश कापसे हे हा सर्व खर्च उचलणार आहेत.
१९ मार्च अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमात शहरातील विविध विभागात फिरणाऱ्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी, विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.