महाराष्ट्र

स्वारातीत “श्वसन विकार” पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरु

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा (स्कीन) आणि छाती विकार (टीबी) विभागातील पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नुकतीच मान्यता दिली होती. आता या मान्यतेनंतर हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास ही भारतीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली असल्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून २ विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणार आहे.


भारतीय आयुर्विज्ञान आयोगाने या विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणास मान्यता दिल्यानंतर आता फक्त रेडिऑलॉजी विभाग वगळता इतर सर्व विभागातील पदव्युत्तर शिक्षणाची सोय स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. या दोन्ही विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळण्यासाठी या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल मस्के यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे डॉ. अनिल मस्के व अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे व विभाग प्रमुख डॉ. विवेकानंद वाघमारे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या पुर्वीपासून येथे असलेल्या सिव्हील हॉस्पिटलला विशेष महत्त्व होते‌ ते टीबी रुग्णालयामुळे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपुर्वी येथील सिव्हिल हॉस्पिटल हे टीबी रुग्णालय म्हणून ओळखले जायचे. या रुग्णालयात मराठवाड्यातीलच नव्हे तर आंध्र आणि कर्नाटक या राज्यातील सिमावर्ती जिल्ह्यातील अनेक रुग्ण येथे टीबी रोगावरील उपचारासाठी येत असत. या रुग्णालयाची भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती ही हा रोग लवकर बरा करण्यासाठी मदत करीत होता.

डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या पुढाकाराने या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्या नंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचा विकास करतांना या टीबी रुग्णालयातील रुग्ण संख्या कमी झाली आणि इतर विभिगांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आजच्या घडीला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील फक्त रेडियॉलॉजी विषय सोडला तर इतर सर्व विषयांत पदव्युत्तर शिक्षण देणारे हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय झाले आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयात टीबी (chest pain) विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरु व्हावे यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी राष्ट्रीय विज्ञान आयोगाकडे हा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावातील सर्व अडथळे डॉ. अनिल मस्के यांनी दुर करीत आता विभागातील पदव्युत्तर शिक्षणासाठी च्या दोन जागांना राष्ट्रीय विज्ञान आयोगाने २३ मार्च २०२३ रोजी च्या आदेशात मान्यता दिली होती.

या वैद्यकीय महाविद्यालयात आता 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून Respiratory Medicine (श्वसन विकार) या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त नांदेड येथील पद्मश्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे या विषयातील पदव्युत्तर शिक्षण आहे, त्यानंतर आता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास या विषयातील पदव्युत्तर शिक्षणास मान्यता मिळाली आहे हे विशेष आहे.

या सोबतच या वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही राष्ट्रीय विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २३ मार्च २०२३ रोजी च्या आदेशात भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या 26(1)(a)(b) 28(1)(2)of the NMC act 2019 नुसार शैक्षणिक वर्षे 2023-24 पासून मंजूरी देण्यात आली असल्याचे म्हटले होते.
या आदेशानंतर आता भारतीय आयुर्विज्ञान आयोगाने २ मे २०२३ घ्या आदेश क्रमांक एनएमसी २०२३-२४/ ०००७९७/०२३६३३ अन्वये पदव्युत्तर अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा विकार या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मिळाल्या असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, छाती विकार विभागाचे प्रमुख डॉ. विवेकानंद वाघमारे, सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल मस्के यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker