स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता डॉ. मुकुंद मोगरेकर


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार याच महाविद्यालयातील जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मुकुंद मोगरेकर यांचेकडे सोपवण्यात आला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे हे काल २९ फेब्रुवारी रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी डॉ. मुकुंद मोगरेकर यांनी पदभार सांभाळावा असे आदेश वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त यांनी आज काढले आहेत. या संदर्भात या विभागाने कार्यालयीन आदेश क्र. संवैशिवसं/अधिष्ठाता/आ.का./डॉ. खैरे सेनि७२४९७/२०२४दि. २९ फेब्रुवारी २०२४ निगर्मित करण्यात आला आहे.


संदर्भात आदेशात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरुन, डॉ. भास्कर खैरे, प्राध्यापक, नेत्र शल्य चिकित्साशास्त्र, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई तथा अतिरिक्त कार्यभार अधिष्ठाता, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई यांचा जन्मदिनांक ०५.०२.१९६० असुन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम १० (१) नुसार व शासन निर्णय क्रमांक सेवानि- २११५/प्र.क्र.८१/१५/वैसेवा-१, दिनांक ०५.०३.२०१५ अन्वये डॉ. भास्कर खैरे हे वयाची ६४ वर्षे दिनांक ०४.०२.२०२४ रोजी पुर्ण करीत असल्याने डॉ. भास्कर खैरे प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई तथा अतिरिक्त कार्यभार अधिष्ठाता, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई यांना दिनांक २९.०२.२०२४ रोजी (म.ऊ) नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त करण्यात येत आहे.


डॉ. भास्कर खैरे, प्राध्यापक, नेत्र शल्य चिकित्साशास्त्र, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई तथा अतिरिक्त कार्यभार अधिष्ठाता, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई यांनी त्यांच्याकडे असलेला अधिष्ठाता या पदाचा अतिरिक्त कार्यभार शासन मान्यतेच्या अधिन राहुन संस्थेतील ज्येष्ठतम अध्यापक डॉ. मुकुंद रा. मोगरेकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, जीवरसायनशास्त्र, स्वारातीग्राशावैम, अंबाजोगाई यांचेकडे सोपवून दिनांक २९.०२.२०२४ रोजी (म.ऊ) कार्यमुक्त व्हावे. असे म्हटले आहे.
सदरील आदेशावर वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांची स्वाक्षरी आहे.